Cyber Sextortion : ‘ती’ नव्हे ‘तो’ होता ! मोहक आवाज, अश्लील जाळं आणि 49 लाखांची लूट

Top Trending News    27-Jun-2025
Total Views |

( Cyber Sextortion )
 
नागपूर : ( Cyber Sextortion )  आताच्या सोसिअल मीडियाच्या जगात अनेक तरुण तरुणी भेटतात. तेथेच त्यांची मैत्री वाढते, आकर्षण निर्माण होत आणि कधी कधी यातून फारच विचित्र प्रकार घडतात. या प्रकरणातही तशीच फसवणूक झाली आहे. आरोपी सुंदरकुमारने स्वत:च्या मोबाईलवर एका सुंदर युवतीचा डीपी लावला. त्या मोबाईलवरुन विवेकला मैत्रीसाठी रिक्वेस्ट पाठविली. विवेकसोबत त्याने अश्लील चॅटींग आणि संभाषण सुरू केले. तो, अगदी मुलीच्या आवाजात विवेकशी बोलत होता. मात्र, मधुर आवाजात हॅलो म्हणणारी ती नसून तो असल्याचे विवेकला कळलेच नाही. त्याला वाटायचे की चॅटींग करणारी आणि व्हिडीओ पाठविणारी मुलगीच आहे आणि तो जाळ्यात अडकला.
 
एप्रिल महिन्यात इंस्टाग्रामवर त्याला ( फिर्यादीला ) एक फ्रेन्ड रिक्वेस्ट आली. ती एका सुंदर तरुणीची होती. सुंदर फोटो पाहून विवेकने फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारली. नंतर त्यांच्यात चॅटींग सुरू झाली. त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. अश्लील चॅटिंग आणि संभाषणामुळे विवेक हा आरोपीच्या जाळ्यात अडकत गेला. आरोपीने त्याला ‘न्यूड’ व्हिडीओ पाठवले. तसेच विवेकनेही स्वत:चे न्यूड फोटो पाठवले. विवेक जाळ्यात अडकताच आरोपीने ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वेगवेगळ्या बँक खात्यात तब्बल 49 लाख रुपये ट्रांसफर करून घेतले. विवेकने बदनामी होण्याच्या भीतीने आरोपीला देण्यासाठी घरचे, स्वत: जवळील आणि मित्रांकडून पैसे उसणे घेतले होते. मात्र, आरोपी त्यानंतरही त्याला पैशांसाठी ब्लॅकमेल करीत होता. फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. शेवटी कंटाळून विवेकने सोनेगाव पोलिसात तक्रार दाखल ( Cyber Sextortion ) केली.
 
सोनेगाव ठाण्याच्या हद्दीतील फिर्यादी विवेक (काल्पनिक नाव) याचे बीएसस्सीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे. तो एका खाजगी कंपनीत कामाला होता. दहावी अनुत्तीर्ण परंतु फसवणूक करण्यात पारंगत असलेल्या ठकबाजाने अश्लिल व्हिडीओ पाठवून नागपुरातील या युवकाची 49 लाखांनी फसवणूक केली ( Cyber Sextortion ) आहे. सायबर पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने आरोपी निष्पन्न करून बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातून त्याला अटक केली आहे. सुंदर कुमार कुंदनकुमार (19) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला 28 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
 
पैसे परत मिळतील
 
आर्थिक लूट करणारी टोळी देशभरात सक्रिय असून या टोळीत आणखी किती लोक सामील असतील या मागचा तपास पोलिस करीत आहेत. या प्रकरणाचा तपास सायबर पोलिसांकडे देण्यात आला. पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळीराम सुतार आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून आरोपी निष्पन्न ( Cyber Sextortion ) केले. सायबरच्या पथकाने पूर्णियाला जावून आरोपीला अटक केली. एकूण 17 बँकातील 15 लाखांची रक्कम गोठविण्यात आली. तसेच, ज्यांच्या बँक खात्यात रक्कम पाठविण्यात आली, अशा काही युवकांनी 10 लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे विवेकला जवळपास 25 लाख रुपये परत मिळतील.