Mobile Addiction Alert : तुम्हाला मोबाईलचं व्यसन तर नाही ना ? तपासा ही लक्षणे

28 Jun 2025 19:52:59

Mobile Addiction Alert
 
मोबाईल ( Mobile Addiction Alert ) आजच्या आपल्या जीवनाची गरज आहे. संवादासाठी, काही शोधण्यासाठी व इतर अनेक गोष्टींसाठी आपल्याला त्याची गरज भासत असते. परंतु, या गरजेच रूपांतर आता व्यसनात होत चाललं आहे. बऱ्याच जणांना आता त्याशिवाय राहावतच नाही. सहसा बऱ्याच जणांना फक्त स्क्रोलींगचीच सवय जडली आहे. मग त्याची गरज असो व नसो. मोबाईल या आता गरजेपेक्षा टाईमपास साठी जास्त वापरला जात आहे. जर तुम्हाला स्वतःला पडताळून पाहायचा असेल तर जाणून घ्या पुढील लक्षणे :
 
जर तुम्हाला कुठल्याही व्यसन ओळखायचं असेल तर त्या तीन मुख्य मुद्दे असतात. मग ते दारूचे व्यसन असो सिगरेट्स असो की मोबाईल असो वा पॉर्नचे. कुठल्याही गोष्टीचा व्यसन असो या तीन गोष्टी प्रामुख्याने पडताळून पाहणे आवश्यक ( Mobile Addiction Alert ) आहे.
 
1) विथड्रावल
 
सर्वात महत्त्वाचं म्हणजे विड्रॉल म्हणजेच जर तुम्ही मोबाईल खेळत आहात आणि मोबाईल खेळता खेळता तुमच्याकडून जर एकदम मोबाईल हिसकावल्या गेला किंवा तुम्हाला असं म्हटलं की, आता तुम्हाला काही वेळ तो वापरता येणार नाही. तुम्हाला कडक शब्दांत सांगितलं की काही दिवस मोबाईल वापरायचा नाही. या परिस्थिस्ती नंतरचा जो काळ असतो म्हणजेच तो विथड्रावल चा असतो. विथड्रावल केल्यानंतर तुमची प्रतिक्रिया खूपच महत्वाची असते. तुम्ही एकदम टेन्शनमध्ये येता किंवा तुम्ही एकदम इरिटेटेड होऊन जाता का ? तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये रिलॅक्स राहू शकत नाही किंवा तुमचं मन परत परत त्याच गोष्टीकडे वळते का ? आकर्षित होतं का ? तुम्हाला रात्री झोप लागत नाही. तुमचं दुसऱ्या गोष्टींमध्ये मन रमत नाही. या सगळ्या लक्षणांना विड्रॉल इफेक्ट ( Mobile Addiction Alert ) असं म्हटलं जातं.
 
जर तुम्हाला मोबाईलच व्यसन झाला असेल आणि मोबाईल तुमच्याकडून काढून घेतल्यावर तुम्हाला शांतपणे राहायला जमत नसेल, तुमची तळफळ होत असेल, तर तुम्ही या व्यसनापासून त्रस्त आहेत. जसं इथे उदाहरण द्यायचं झालं तर पाण्यातून काढलेल्या माशासारखी तुमची अवस्था जर होत असेल तर तुम्हाला मोबाईलचं व्यसन जडल आहे, असं आपण म्हणू शकतो.
 
2) टॉलरन्सची क्षमता
 
दुसऱ्या अवस्थेचा विचार केला तर आपण त्याला म्हणू शकतो टॉलरन्स. टॉलरन्स म्हणजे काय तर तुम्ही भरपूर अशा व्यक्ती बघितल्या असतील जे रेगुलर ड्रिंक करतात ते असं सांगतात की त्यांची सुरुवात एक ग्लासपासून झालेली असते. एक ग्लास घ्यायचं आणि त्यामुळे त्यांना त्याची नाश जाणवायची. परंतु, नंतर त्यांची कॅपॅसिटी वाढली. ती डबल झाली म्हणजे त्या व्यसनाची जशी सवय होते तशी तशी त्या गोष्टीची कॅपिसिटी ही तुमची वाढत जाते. तसंच मोबाईलच्या व्यसनाचा असत. पहिले पंधरा मिनिटं इंस्टाग्राम स्क्रोल केलं तर तुम्हाला चांगलं वाटतं, त्याच्यानंतर तुम्ही ते ठेवून द्यायचे. मग, तुमची कॅपिसिटी वाढली आणि आता तुम्ही अर्धा तास वापरता, त्यानंतर तुम्ही एक तास वापरता, मग नंतर तुम्ही एक तास, दोन तास, तीन तास अशा पद्धतीने तुमची कॅपॅसिटी आणि इच्छा त्याबाबतीत वाढत जाते. व्यसन जाळ्यावर जास्त वेळ त्याचा वापर केल्याशिवाय तुम्हाला त्या गोष्टीपासून सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. इथे तुमचं टॉलरन्स जे आहे ते हळूहळू निर्माण ( Mobile Addiction Alert ) होतं. तुम्हाला तेवढाच आनंद मिळण्यासाठी तुमची वेळ घालवण्याची कॅपॅसिटी वाढते. त्याशिवाय, तुम्हाला संतुष्टी मिळत नाही. तुम्ही ती गोष्ट खूप वेळासाठी करत असतात याला आपण टॉलरन्स असं म्हणू शकतो.
 
3) आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या दैनंदिन जीवनात या मोबाईलमुळे कुठल्याही प्रकारचा अडथळा क्रिएट होत असेल तर आपण म्हणतो की तुम्हाला या गोष्टीचं व्यसन आहे म्हणजेच मोबाईलचे व्यसन जडलेला ( Mobile Addiction Alert ) आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0