Shocking Marriage Twist : सोयरिक बघायला गेलेल्या सासूने स्वतःच केले जावयाशी लग्न ! मुलीने घेतला असा निर्णय....

04 Jun 2025 16:48:11

mai 
शाहजहानपूर : ( Shocking Marriage Twist ) हल्ली सासू-जावयाची प्रेमकहाणी सर्वत्र खळबळ उडवत आहे. अशाच प्रकारची आणखी एक अनोखी घटना शाहजहानपूरमध्ये उघडकीस आली आहे. घटना अशी घडली की शाहजहानपूर मध्ये एक महिला तिच्या मुलीसाठी मुलगा पाहायला गेली होती. परंतु, तिला तो मुलगा इतका आवडला की तिने मुलीचे लग्न सोडून स्वतःच त्या मुलाशी लग्न केले. या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. महिलेने त्या मुलाशी मंदिरात लग्न केले. विशेष म्हणजे या अनोख्या लग्नात मुलीने स्वतः तिच्या आईला पाठिंबा दिला. तिला तिच्या नवीन आयुष्याच्या सुरुवातीसाठी शुभेच्छाही दिल्या. आपल्या आईच्या आनंदासाठी एका मुलीने आपल्या सुखाला बाजूला सारला इतकच.
 
लग्नाची बातमी गावात पोहोचताच परिसरात सर्वत्र खळबळ उडाली. गावकरी आश्चर्यचकित झाले आणि हे प्रेमप्रकरण आता प्रत्येक गावात चर्चेचा विषय बनले आहे. बांदा येथील देवकाली येथील रणमस्तपूर भागातील एका 45 वर्षीय महिलेच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. तेव्हापासून ती तिच्या मुलीसोबत एकटीच राहत होती. मुलगी लग्नाच्या वयाची झाली ( Shocking Marriage Twist ) आहे म्हणून ती महिला तिच्यासाठी योग्य वर शोधत होती. अनेक ठिकाणी नातेसंबंध दिसले पण काहीही निष्पन्न झाले नाही.
 
विशेष म्हणजे, ती महिला शाहजहांपूर जवळील एका गावात लग्नाच्या प्रस्तावासाठी गेली होती. जिथे तिला तिच्या मुलीसाठी योग्य असलेला एक तरुण सापडला. तिने तिच्या मुलीचे लग्न त्याच्याशी लावून देण्याचे ( Shocking Marriage Twist ) ठरवले. त्यानंतर तिने त्या तरुणाचा मोबाईल नंबर घेतला आणि दोघेही फोनवर एकमेकांशी संपर्क साधू लागले. हळूहळू या संपर्काचे रूपांतर मैत्रीत झाले आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. या काळात, ती महिला स्वतः त्या तरुणाशी लग्नाबद्दल बोलू लागली. आश्चर्यकारक गोष्ट अशी होती की तो तरुणही कोणताही आढेवेढे न घेता लग्नाला तयार झाला. आणि हा आगळावेगळा विवाह संपन्न झाला.
 
 
Powered By Sangraha 9.0