Trump Economic Blow : ट्रम्प यांच्या 'वन बिग ब्युटीफुल बिलामुळे भारतीयांच्या खिश्याला पडू शकते भगदाड

08 Jun 2025 17:16:08


trump eco

दिल्ली - ( Trump Economic Blow ) भारत हा परदेशातून मोठ्या प्रमाणात पैसा मिळवणाऱ्या देशांपैकी एक आहे. या श्रेणीत इतर प्रमुख देश म्हणजे मेक्सिको, चीन, फिलीपिन्स, फ्रान्स, पाकिस्तान आणि बांगलादेश यांचीही गणती होते. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अर्थतज्ज्ञांनी सादर केलेल्या एका पेपरनुसार, 2023 मध्ये परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी भारतात राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबांना 119 अब्ज डॉलर्स पाठवले. हे भारताच्या वस्तू व्यापारातील तूट भरून काढण्यासाठी पुरेसे आहे. ही रक्कम थेट परकीय गुंतवणुकीपेक्षाही जास्त असल्याचेही एकीकडे बोलल्या जाते आहे. महत्त्वाचे म्हणजे परदेशातून भारतात येणाऱ्या या पैशाचा सर्वांत मोठा भाग अमेरिकेतून आला हे विशेष. यामध्ये परदेशात राहणाऱ्या लाखो स्थलांतरितांनी त्यांच्या पालकांच्या औषधोपचारासाठी, कुटुंबाच्या शिक्षणाचा खर्च आणि गृहकर्जाचे हप्ते भरण्यासाठी परत पाठविलेले पैसे समाविष्ट ( Trump Economic Blow ) आहेत.

परदेशातून येणाऱ्या पैशाचा वाटा 15%

जागतिक बँकेच्या मते, 2008 पासून परदेशातून पैसे मिळविणाऱ्या देशांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर ( Trump Economic Blow ) राहिला आहे. 2001 मध्ये भारताचा वाटा 11 टक्के होता जो आता 15 टक्के झाला आहे. अर्थातच गेल्या 25 वर्षात देशाबाहेरून येणाऱ्या रक्कमेत चार टक्क्यांची वाढ झाली आहे. भारताच्या मध्यवर्ती बँकेचे म्हणणे आहे की, या श्रेणीत भारत मजबूत राहण्याची अपेक्षा आहे. एका अंदाजानुसार 2029 पर्यंत हा आकडा 160 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल. 2000 पासून परदेशातून येणाऱ्या या पैशाचे भारताच्या जीडीपीमध्ये योगदान सुमारे तीन टक्के आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतातील स्थलांतरित लोकसंख्या 1990 मध्ये 66 लाख होती ती 2024 मध्ये 1 कोटी 85 लाख झाली आहे. जागतिक स्तरावर तिचा वाटा 4.3 टक्क्यांवरून 6 टक्क्यांहून अधिक झाला आहे. या भारतीय स्थलांतरितांपैकी जवळजवळ निम्मे आखाती देशांमध्ये आहेत. तथापि, विकसित अर्थव्यवस्थांमध्ये, विशेषतः अमेरिकेत, कुशल कामगार क्षेत्रात स्थलांतरितांच्या संख्येत वाढ झाली आहे आणि याचे एक कारण म्हणजे भारताचे आयटी क्षेत्र. भारतीयांनी आयटी क्षेत्रात मिळवलेले यश जगाच्या पाठीवर देशाची बाजू भरभक्कम ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते आहे. अमेरिकेतही आयटी क्षेत्रातील ( Trump Economic Blow ) भारतीय तरुणांची संख्या मोठी आहे.

12 ते 18 अब्ज डॉलर्सचे संभाव्य नुकसान

अमेरिकेतील 78 टक्के भारतीय स्थलांतरित व्यवस्थापन, व्यवसाय, विज्ञान आणि कला यासारख्या उच्च उत्पन्न असलेल्या क्षेत्रात ( Trump Economic Blow ) काम करतात. कर आणि चलन रूपांतरणाचा खर्च हा दीर्घकाळापासून जागतिक धोरणात्मक चिंतेचा विषय ठरला हे देखील विसरून चालणार नाही. कारण त्याचा थेट कुटुंबांवर परिणाम होतो. या खर्चाची जागतिक सरासरी लक्ष्यापेक्षा जास्त आहे हे विशेष. तथापि, परदेशातून घरी पैसे पाठविण्याच्या बाबतीत रूपांतरणाच्या दरानुसार भारतात पैसे पाठविणे किफायतशीर ठरते आहे. यावरून असे दिसून येते की, या बाबतीत डिजिटल पद्धती वाढल्या आहेत आणि बाजारात स्पर्धादेखील वाढली आहे. अशा परिस्थितीत, जर इतर देशांमधून पाठवण्यात येणारा पैसा 10 ते 15 टक्क्यांनीही कमी झाला, तर भारताला दरवर्षी 12 ते 18 अब्ज डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. यामुळे डॉलरचा पुरवठा कमी होईल आणि रुपयावर दबाव येईल. त्याचा सर्वांत मोठा परिणाम केरळ, उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या राज्यांमधील कुटुंबांवर होऊ शकतो. कारण या राज्यांसाठी परदेशातून येणारा पैसा हा विशेष करून शिक्षण, आरोग्य सेवा आणि घर यासारख्या गरजांसाठी ( Trump Economic Blow ) पाठवले जातात.

'वन बिग ब्युटीफुल बिल' मुळे भारतीयांना मोठे नुकसान

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Trump Economic Blow ) यांनी प्रस्तावित केलेला 'वन बिग ब्युटीफुल बिल' हा कर स्थलांतरित कामगारांकडून अब्जावधी रुपये हिसकावू शकतो, ज्यांपैकी बरेच जण अमेरिकेत आधीच कर भरतात. त्याचे संभाव्य परिणाम काय असतील ? यामुळे अनौपचारिक पद्धतीने रोख स्वरूपात मिळणाऱ्या पैशात वाढ होऊ शकते, तसेच परदेशातून येणाऱ्या भारताच्या स्थिर पैशाच्या स्रोतालाही धक्का बसू शकतो. कारण डोनाल्ड ट्रम्प ( Trump Economic Blow ) यांच्या 'वन बिग ब्युटीफुल बिल'मध्ये एक लपलेली तरतूद अशी आहे, ज्याद्वारे अमेरिका परदेशात पाठविलेल्या पैशातून अब्जावधी डॉलर्स अतिशय काळजीपूर्वक काढून ते आपल्या खिशात ठेवू शकते. जर असे होण्यास सुरूवात झाली तर त्याचा थेट परिणाम भारतीयांच्या अर्थशास्त्रावरही होईल हे निश्चित. त्यात अमेरिकन ग्रीन कार्ड धारक आणि एच-1 बी व्हिसा सारख्या तात्पुरत्या व्हिसा कामगारांसह परदेशी कामगारांनी त्यांच्या देशात पाठविलेल्या पैशावर 3.5 टक्के कर लादण्याचा प्रस्ताव आहे. कारण भारतात परदेशातून येणाऱ्या एकुण पैशांपैकी साधारण 119 अब्ज डॉलर्स अमेरिकेतून येतात.

ट्रम्प यांच्या अशा धोरणी स्वभावामुळे अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीयांसह इतर देशातील नागरिकांच्या मनामध्येही चिंतेची लहर आहे. अनेकांनी याबाबतीत असुरक्षितताही व्यक्त केली असून, वन बिग ब्युटीफुल बिलाच्या कडक अटी लागू झाल्यास त्याचा थेट परिणाम भारतीयांच्या खिश्यावर पडणार आहे.
Powered By Sangraha 9.0