Border Tragedy : घुसखोरी की तहान ? वाळवंटात मृत्यूमुखी पडलेल्या पाकिस्तानी जोडप्याच्या हालचालींवर संशय

Top Trending News    01-Jul-2025
Total Views |

pak ind
 
जैसलमेर : ( Border Tragedy ) भारत पाकिस्तान यांच्या सीमेवर सुरु असलेला तणाव पाकिस्तानातील एका हिंदू जोडप्याच्या मृत्यूचे कारण बनला. भारतात सुरक्षित आणि समृद्ध जीवनाच्या आशेने दोघांनी व्हिसासाठी अर्ज केला होता. भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांमुळे त्यांचा व्हिसा अर्ज फेटाळण्यात आला होता. तेव्हा त्यांनी भारतात येण्यासाठी बेकायदेशीरपणे सीमा ओलांडली. हा प्रकार सीमेपलीकडून घुसखोरी किंवा कोणत्याही गुन्हेगारी कारवायांशी संबंधित असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी शंका निर्माण झाली आहे.
 
पाकिस्तानी किशोरवयीन जोडपं रवी कुमार (17) आणि शांती बाई (15) यांनी नुकतेच जैसलमेरजवळील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली आणि गुप्तपणे भारतात प्रवेश केला. सीमा ओलांडल्यानंतर, हे जोडपे भिभियान वाळवंटात हरवले. ज्यामुळे तहान आणि निर्जलीकरणामुळे त्यांचा मृत्यू झाला. डिहायड्रेशनमुळे त्यांचा मृत्यू झाला अशी शक्यता वर्तविली जात आहे कारण त्यांच्या मृतदेहांजवळ एक रिकामी पाण्याची बाटली सापडली आहे. जी त्यांनी पाकिस्तानातून आणली होती. रविवारी वैद्यकीय मंडळाने शवविच्छेदन ( Border Tragedy ) केले.
 
त्या दोघांचे मृतदेह शनिवारी आढळले. घटनास्थळी या तरुणाच्या चेहऱ्यावर एक रिकामा जेरीकॅन लावलेला दिसला. जो त्याच्या मृत्यूपूर्वी त्यांना झालेल्या वेदना दर्शवितो. रवी कुमार आणि शांती बाई यांचे लग्न चार महिन्यांपूर्वी सिंधमधील मीरपूर माथेलो येथे झाले होते. रवी कुमारच्या वडिलांनीही त्यांना अशा प्रकारे भारतीय सीमेमध्ये प्रवेश करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न ( Border Tragedy ) केला, परंतु ते हट्टाला पेटले होते.
 
घुसखोरी किंवा गुन्हेगारीची शक्यता
 
हिंदू पाकिस्तानी विस्थापित संघटना आणि बॉर्डर पीपल्स ऑर्गनायझेशनचे जिल्हा संयोजक दिलीप सिंग सोढी म्हणाले की, जर भारत सरकारने मृतदेह परत केले तर पाकिस्तानमधील त्यांचे कुटुंबीय ते स्वीकारण्यास तयार आहेत. जरी मृतदेह पाकिस्तानला पाठवले गेले नाहीत तरी कुटुंब हिंदू रीतिरिवाजांनुसार भारतात अंतिम संस्कार करण्यास तयार आहे. एसपी म्हणाले की, मृतदेहांजवळ पाकिस्तानी नागरिक ओळखपत्रे देखील सापडली आहेत. ज्यामुळे सुरक्षेची चिंता वाढली आहे. ही घटना सीमेपलीकडून घुसखोरी किंवा कोणत्याही गुन्हेगारी कारवायांशी संबंधित असण्याची शक्यता आहे. पोलिस आणि इतर सुरक्षा संस्था या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत आणि नियमांनुसार कायदेशीर कारवाई ( Border Tragedy ) केली जात आहे.