Flood But No Relief : मुसळधार पावसाने संसार उध्वस्त पण मिळणार नाही मदत, कारण....

10 Jul 2025 22:48:45

floodd
 
नागपूर : ( Flood But No Relief ) शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. नागपूर शहरात 150 च्या जवळपास घरांमध्ये पाणी शिरल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यातील बहुतांश घरेही नदी, नाल्या लगतची असल्याचे सांगण्यात येते. अनेक नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी होते. पहाटेपासूनच त्यांना जागे राहावे लागले. घरातील साहित्यांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. पावसामुळे नुकसान झाल्यावरही या लोकांना मदत मिळणार नाही. त्यांच्या मदतीत शासनाच्या नियमांची आडकाठी येणार आहे.
 
गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला. यामुळे नदी, नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली. मंगळवारला मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. अनेकांच्या घरात पाणी शिरले. नागपूर शहरात 125 ते 150 लोकांच्या घरात पाणी शिरल्याचा अंदाज प्रशासनाचा आहे. यातील बहुतांश घर हे नदी व नाल्या लगतचे आहे. या पावसाने नागपूरकरांसाठी काळरात्र ठरलेल्या अंबाझरी पुराची आठवण करून दिली. या पुरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. पावसाने कधीच घातला नाही एवढा धुमाकुळ त्या रात्री ( Flood But No Relief ) घातला.
 
अंबाझरीच्या निकट राहणाऱ्या नागरिकांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. हे संकट नागपूरकरांवर का ओढावले, त्याला कारणीभूत कोण ? याचा नेमका छडा लावण्याचा प्रयत्न गत वर्षभरात उच्च न्यायालयाने ख-या अर्थाने केला. न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठाने समस्येच्या खोलाशी जाऊन न केवळ पुराचे कारण शोधले तर 36 सुनावण्या घेत कुंभकर्णाच्या भूमिकेतील महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभागालाही जागे केले. प्रशासन जागे झाले, राज्याने निधी दिला. नुकसान भरपाईही पोहचली. प्रवाहाला अडथळा ठरत असलेले अतिक्रमणही हटविले. परंतु, पुराच्या तडाख्यात तुटलेल्या तटरक्षक भिंती तब्बल दोन वर्षे ( Flood But No Relief ) लागले.
 
प्रशासनाने तेव्हाही पूरग्रस्तांच्या भावनांशी खेळ केला. महसूल विभागाने पूरग्रस्तांच्या खात्याची केवायची आधीच करणे अपेक्षित होते. परंतु प्रारंभी पूरग्रस्तांच्या खात्यात निधी वळता केला आणि दोन दिवसांच्या आत केवायसीचे कारण देत निधी परत घेण्यास सुरुवात केली. तसे करताना पूरग्रास्तांना जराशीही कल्पना देण्यात आली नाही. 30 कोटी 10 लाख 36 हजार पूरग्रस्तांच्या खात्यात वळते झाले. 3 हजार 866 अर्जदारांचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांनी प्रशासनाकडून अत्यंत तोकडी मदत मिळाल्याने नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयाने नदी किनारी राहणा-या कुटुंबांना 10 हजार दिले. मोठ्या व्यवसायिकांना 50 हजार व छोट्या व्यवसायिकांना 10 दिले. प्राथमिक अंदाजानुसार 275 कोटींच्या घरात नुकसान ( Flood But No Relief ) झाले.
 
शासनाचा नियम काय ?
 
पाण्यामुळे घरातील साहित्याचे नुकसान झाले. झालेल्या नुकसानासाठी आर्थिक मदत मिळेल, अशी त्यांचा अपेक्षा आहे. परंतु त्यांना मदत मिळणार नाही. शासनाच्या नियमानुसार 48 तास पाणी घरात पाहिजे. पाणी घरात राहिल्यावर मदत मिळते. परंतु अनेकांच्या घरात पाणी शिरले व ते निघून गेले. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार त्यांना मदत मिळणार नाही आहे. प्रशासनाकडून अद्याप पंचनाम सुरू करण्यात आले नसल्याचे सांगण्यात ( Flood But No Relief ) येते.
 
Powered By Sangraha 9.0