Municipal Negligence : मनपाची कंत्राटदाराला फक्त नोटीस पुरेशी आहे का ? शहरभर 'मृत्यू' उघडे फिरताहेत

Top Trending News    12-Jul-2025
Total Views |

nmc n
 
नागपूर : ( Municipal Negligence ) लकडगंज येथील कच्ची व्हिसा मैदान येथे कृत्रिम विसर्जन टाकीत सात वर्षीय महेश कोमल थापा बुडाल्यामुळे मृत्यू झाला. या संदर्भात मनपा आयुक्त अभिजीत चौधरी यांनी ही टाकी कंत्राटदाराच्या नियंत्रणाखाली असून, ती मनपाच्या ताब्यात अधिकृतपणे देण्यात आली नसल्याचे सांगितले. 'टाकी अर्धवट उघडी कशी ठेवली गेली आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना का नव्हत्या याची आम्ही चौकशी करणार ( Municipal Negligence ) आहोत. मुलांना तेथे कधीही प्रवेश मिळाला नसता' असे ते म्हणाले.
 
या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी नागपूर महापालिकेने कंत्राटदार मेसर्स प्रशांत कन्स्ट्रक्शन्सला कथित निष्काळजीपणाबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. बॅरिकेडिंग आणि सुरक्षेचे आश्वासन देऊनही, टाकीवर फक्त एक टिनची शीट लावलेली होती. शिवाय, तात्पुरती दुरुस्ती, कोणताही गार्ड किंवा योग्य बॅरिकेड तैनात नव्हता. त्यासोबतच कार्यकारी अभियंता (प्रकल्प) अल्पना पटणे म्हणाल्या, कंत्राटदाराला बांधकाम हस्तांतरित होईपर्यंत बॅरिकेडिंग आणि 24 तास सुरक्षा सुनिश्चित करण्याची जबाबदारी आहे. या संदर्भात नोटीस जारी केली जाईल आणि चौकशीअंती पुढील कारवाई ( Municipal Negligence ) केली जाईल.
 
नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया
 
नारी, मानकापूर, कळमना, नरसाळा आणि वाठोडा येथील स्थानिक सांगतात, मोकळी मैदाने आणि खेळाचे मैदान किचडाने व्यापले आहे. येथे कुठलेही सुरक्षा बॅरिकेड बसवलेले नाहीत. “मुले येथे दररोज खेळतात. फलक किंवा रक्षकांशिवाय, कोणीही सहजपणे त्यात पडू शकते,” असे पारडीच्या दुर्गा देवी नगरचे रहिवासी राजेश वानखेडे म्हणाले. कळमना मार्केटजवळील एका डंपिंग साइटवर असे दिसून आले की सखल जमीन पाण्याने भरलेल्या खड्ड्यात रूपांतरित झाली आहे. पृष्ठभागावर हिरवे शेवाळ पसरले आहेत, इथे कुठे कोणताही इशारा देणारे चिन्ह नाहीत. अशा प्रकारच्या दिरंगाईमुळे शहरात धोक्याची घंटा वाजते ( Municipal Negligence ) आहे.
 
विसर्जन टाक्या किंवा जलाशयांना बॅरीकेड्स करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. अंबाझरी व गोरेवाडा तलावांसारख्या संवेदनशील भागांजवळ जीव वाचविण्याच्या तंत्रांमध्ये प्रशिक्षीत अग्निशमन दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.नागरीकांनी पावसाळयात ओव्हरफ्लो होणाऱ्या जलायशयांपासून दूर राहावे.
- अभिजीत चौधरी, आयुक्त, महानगरपालिका
 
गुन्हे दाखल करा - दुनेश्वर पेठे
 
कच्छी विसा मैदानातील गणेश विसर्जन टाकीत पडून 9 वर्षाचा महेश कोमल थापा याचा दुदैवी मृत्यू झाला. याप्रकरणी मनपा अधिकारी जबाबदार असून, दोषी अधिकाऱ्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी केली. टाकीवर केवळ टीनाचा पत्रा टाकून बंद करण्यात आले. जर, टाकी आधीच झाकली असती तर दुर्घटना घडली नसती. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल करून मृतांच्या कुटुंबाला भरपाई द्यावी तसेच मनपात एक सदस्याला नोकरी द्यावी अशी मागणी पेठे यांनी केली.