Bhendi Vs Teenage : भेंडीचं नाव घेताच किशोरवयीन मुलाने थेट गाठली राजधानी !

Top Trending News    13-Jul-2025
Total Views |

 Bhendi  
नागपूर : ( Bhendi Vs Teenage ) किशोरवयीन मूल कधी काय करतात काही सांगता येत नाही. भाजीवरून घडलेला हा प्रसंग खूपच आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे. लहान-लहान गोष्टींवरून मुले घर सोडून गेल्याचे अनेक प्रकरणे पुढे आली आहेत. अशीच एक घटना कोतवाली पोलिस ठाण्यांतर्गत घडली आहे. आईने भेंडीची भाजी बनवल्यामुळे एक 17 वर्षीय मुलाने घरी वाद घातला आणि नाराज होऊन त्याने घर सोडण्याचा निर्णय घेऊन त्यावर अंमल सुद्धा केला. तक्रारनुसार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या पथकाने त्याचा शोध घेतला. त्याला सुखरूप कुटुंबाच्या स्वाधीन केले आहे.
 
रोशन (काल्पनिक नाव) हा 17 वर्षांचा असून तो बाराव्या वर्गात शिकत आहे. घरी होत असलेल्या बहुतांश स्वयंपाक मुलांना घरी आवडत नाही. त्यालाही भेंडी अजिबात आवडत नव्हती. यावरून त्याचा नेहमी आईशी वाद व्हायचा. तो सतत बाहेरून काहीतरी मागवून खात होता. मागच्या गुरूवारी घरी पुन्हा भेंडीची भाजी बनली. सायंकाळी कलश घरी आल्यानंतर त्याला आईने भेंडीची भाजी बनवल्याचे समजले. त्याने यावरून आईशी वाद घातला. आईनेही त्याला चांगले फटकारले. यावरून नाराज कलश रात्री 11 वाजताच्या सुमारास घरून निघून ( Bhendi Vs Teenage ) गेला.
 
रागाच्या भरात तो थेट रेल्वे स्थानकावर पोहोचला. संतापात असलेल्या रोशनने दिल्लीकडे जाणाऱ्या ट्रेनचा मार्ग निवडला आणि तो थेट दिल्लीला पोहोचला. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर रोशन कुठेही दिसत नसल्याने कुटुंबीय चिंतीत झाले. त्याचा सर्वत्र शोध घेऊन थकल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. अल्पवयीन असल्याने कोतवाली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदविला.
 
गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या पथकाने रोशनचा ( Bhendi Vs Teenage ) शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासातून तो दिल्लीला गेल्याची माहिती मिळाली. पोलिस आणि कुटुंबीयांनी दिल्लीतील त्याच्या मित्रांशी संपर्क केला. मित्रांनीही त्याचा शोध सुरू केला. तो मिळताच कुटुंबीयांना सूचना दिली. त्यानंतर त्याची समजूत काढून विमानाने नागपूरला रवाना केले. विमानतळावर पोहोचताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. समुपदेशन केल्यानंतर त्याला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.