Modi Calls Nikam : उज्ज्वलजी, मराठीत बोलू की हिंदीत ? निकमांनी केला मोदींच्या फोनचा खुलासा

13 Jul 2025 23:00:48

Modi Calls Nikam
 
मुंबई - ( Modi Calls Nikam ) भारतीय संविधानाच्या कलम 80 (3) अंतर्गत, राष्ट्रपतींना राज्यसभेत 12 सदस्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार राष्ट्रपती यांना असतो. हे सदस्य कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा यासारख्या क्षेत्रात विशेष योगदानासाठी निवडले जातात. राज्यसभेच्या एकूण सदस्यांची संख्या 250 आहे. ज्यामध्ये 238 निवडून आलेले आणि 12 नामांकित सदस्य आहेत. सध्या राष्ट्रपतींनी राज्यसभेसाठी चार नवीन नामांकित सदस्यांची नियुक्ती केली आहे. यात केरळचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मास्ते, भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि सुप्रसिद्ध इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन तसेच उज्ज्वल निकम यांनाही राज्यसभेवर नामांकित करण्यात आले आहे.
 
मोदींचा फोन आणि निकमांचा खुलासा
 
राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती आता राज्यसभेवर करण्यात आली आहे. आता संसदेचे वरीष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेचे सदस्य असतील. या संदर्भातली माहिती मिळताच निकम यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या नेत्यांचे आभार मानले. आणि त्यांनी मोदींच्या त्या फोनचा खुलासा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला फोन त्यांच्यासोबत झालेली चर्चा याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेत बोलू की, हिंदी भाषेत बोलू, असा प्रश्न आपल्याला विचारला होता, असे देखील त्यांनी सांगितले. या वेळी मी त्यांना स्वतः मोदींना दिलेल्या उत्तराचाही उल्लेख केला. या वेळी निकम यांनी तुम्हाला दोन्ही भाषा उत्कृष्ट येत असल्याचे म्हटले. मोदींनी आपल्याशी सुरुवातीला मराठीतूनच संवाद साधल्याचे देखील निकम ( Modi Calls Nikam ) यांनी सांगितले आहे.
 
काय म्हणाले उज्ज्वल निकम
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निकम याना फोन ( Modi Calls Nikam ) केला, त्यांनी बोलण्याची सुरुवात ही मराठीतूनच केली. मी मराठीत बोलू का हिंदी बोलू ? असा प्रश्न त्यांनी निकम यांना विचारला. यानंतर त्यांनी सुरुवातीला मराठीतच बोलायला सुरुवात केली. राष्ट्रपती महोदयांनी तुमच्यावर एक जबाबदारी सोपवण्याचे ठरवले आहे. हे इतके लवकर होईल असे मला अपेक्षित नव्हते. मात्र, हे अतिशय जलद गतीने झाले आहे. त्यासाठी मी राष्ट्रपती महोदया तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा नेते जे. पी. नड्डा, अमित शाहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत असल्याचे उज्ज्वल निकम यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. प्रसार माध्यमांशी बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की, नेहमी चांगले काम करण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेल. ही माझ्यावर आलेली जबाबदारी महत्वाची आहे. डेव्हिड हेडली याची साक्ष घेतली, त्यावेळी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस याची मोठ्या प्रमाणात मदत झाली असल्याचे देखील उज्वल निकम ( Modi Calls Nikam ) यांनी सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0