Unhygienic Railway Food : वेज बिर्याणी… आणि तोंडात आला नॉनवेज झुरळ ! तक्रार झाली पण कारवाईच नाही ?

Top Trending News    13-Jul-2025
Total Views |

Unhygienic
 
नागपूर : ( Unhygienic Railway Food ) रेल्वे स्थानकावर झालेल्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांचे आरोग्याच धोक्यात आले. 12721 दक्षिण एक्सप्रेसमध्ये हा एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना शुक्रवार सकाळी सुमारे 10 वाजताच्या सुमारास घडली आहे. दक्षिण एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या भोपाळ, मध्य प्रदेश येथील दिपांशू सोनवाने यांना स्थानकावरून खरेदी केलेल्या बिर्याणीमध्ये मृत झुरळ आढळले. त्यांनी 'रेल मदत' ॲपवर याची तक्रार केली आहे. बातमी लिहेपर्यंत रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती.
 
ही दक्षिण एक्सप्रेस नागपूर स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 वर थांबली होती. दिपांशू बी-2 कोचमधील सीट क्रमांक 7 मधून प्रवास करीत होते. झोपेतून जागे झाल्यावर त्यांनी फलाटावर बिर्याणी विकणाऱ्या एका व्यक्तीकडून 80 रुपयांना बिर्याणी विकत घेतली. दुपारी जेव्हा दिपांशूने बिर्याणी खाल्ली तेव्हा त्याला सुरुवातीला ती सर्वसामान्यच वाटली होते. उरलेली बिर्याणी त्यांनी सीट खाली ठेवली. काही वेळाने अचानक त्यांचे लक्ष गेले असता, त्यांना बिर्याणीमध्ये एक मृत झुरळ दिसले. त्यांनी तात्काळ त्याचे छायाचित्र घेतले. लगेचच 'रेल मदत' ॲपवर तक्रार ( Unhygienic Railway Food ) नोंदवली.
 
या तक्रारीनंतर टी.टी.ई. आणि इतर कर्मचाऱ्यांनी चौकशी केली. परंतु, दुसऱ्या दिवसापर्यंतही केवळ 'चौकशी प्रक्रिया सुरू आहे' अशीच प्रतिक्रिया मिळत होती. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान रेल्वे सुरक्षा दलाने ही बिर्याणी विकणाऱ्या अवैध विक्रेत्याला ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. या पूर्वीही विषबाधा अशीच एक घटना 26 एप्रिल 2024 रोजीही समोर आली होती. 22534 यशवंतपुर-गोरखपुर सुपरफास्ट एक्सप्रेसमधील 200 हून अधिक प्रवाशांना अंड्याच्या बिर्याणी मुळे विषबाधा ( Unhygienic Railway Food ) झाली होती.