Pakistan Seeks Truce : पाकिस्ताननं सैन्याने मागितली होती युद्धबंदी ? पीसीआयच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

14 Jul 2025 17:51:06
 
operation
 
इस्लामाबाद - ( Pakistan Seeks Truce ) इस्लामाबाद येथील पीसीआयच्या एका थिंक टँकच्या अहवालात एक आश्चर्यकारक आणि धक्कादायक दावा करण्यात आला आहे. मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानात झालेल्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षादरम्यान पाकिस्तानी सैन्याने युद्धबंदीची विनंती केली होती. इस्लामाबाद येथील पाकिस्तान-चीन इन्स्टिट्यूटच्या अहवालात सांगतो आहे की पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी ऑपरेशन सिंदूर थांबवण्यासाठी त्यांच्या भारतीय समकक्षांशी संपर्क साधला होता. अहवालात म्हटले आहे की ट्रम्प प्रशासन दक्षिण आशियात अमेरिकन वर्चस्व राखण्यात अपयशी ( Pakistan Seeks Truce ) ठरले आहे. तसेच अमेरिका आणि नाटोने चीनसोबतच्या तांत्रिक तफावतीबद्दलच्या त्यांच्या गृहीतकांचे पुनर्मूल्यांकन करावे. कारण पाकिस्तान मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिनी लष्करी यंत्रणा पाश्चात्य तंत्रज्ञानापेक्षा जास्त कामगिरी करत आहेत.
 
या अहवालाने डोनाल्ड ट्रम्प यांचा मध्यस्थीचा दावा फेटाळून लावला आहे. भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षादरम्यान ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याने अमेरिकेच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेच्या मित्र भारताला पाठिंबा देण्याऐवजी एक्स वर मध्यस्थी करण्याची राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा ही राजनैतिक चूक असल्याचे वर्णन करण्यात आले आहे. ट्रम्पच्या मध्यस्थी प्रयत्नांमुळे इंडो-पॅसिफिक प्रदेशातील अमेरिकन धोरणाला हानी पोहोचली आहे. ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानशी समान वागणूक दिली आणि काश्मीरवर मध्यस्थी करण्याची ऑफर दिली. या भूमिकेमुळे प्रादेशिक स्थिरीकरण करणाऱ्या म्हणून चीनची भूमिका वाढली ( Pakistan Seeks Truce ) आहे.
 
ऑपरेशन सिंदूर आणि काश्मीरमध्ये तिसऱ्या पक्षाचा सहभाग नसल्याच्या भारताच्या कथनाला हा अहवाल वजन देतो. भारताने मध्यस्थीचे दावे वारंवार नाकारले आहेत आणि म्हटले आहे की युद्धबंदीची पुढाकार पाकिस्तानने घेतला होता. ट्रम्प यांनी पाकिस्तानची प्रशंसा करून आणि काश्मीरवर मध्यस्थी करण्याची ऑफर देऊन, अमेरिकेने अनवधानाने पाकिस्तानचा मुख्य समर्थक चीनचा प्रभाव वाढवला आहे. यामुळे जागतिक नेता म्हणून ट्रम्पची प्रतिमा कमकुवत झाली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0