_202507152232054987_H@@IGHT_500_W@@IDTH_950.png)
दिल्ली : ( Jet Engine Deal India ) अमेरिकेकडून भारताला आता नवे गिफ्ट मिळाले आहे. जेट इंजिन बनवणारी कंपनी जीईने भारताला त्यांचे दुसरे इंजिन सोपवले आहे. या इंजिनचा वापर हलक्या लढाऊ विमानासाठी केला जाऊ शकतो. हे इंजिन एलसीए असलेले तेजस मार्क 1ए ला लावले जाऊ शकते. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या मान्यतेनंतर आणखी 97 लढाऊ विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. यामुळे भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे. भारत-अमेरिका यांच्यातील या भागीदारीमुळे शेजारील पाकिस्तानची चिंता वाढली आहे.
भारताच्या हवाई दलाकडे अनेक लढाऊ विमाने आहेत. जे कुठल्याही प्रकारच्या हल्ल्याला सामोरे जाण्यासाठी तयार असतात. प्रत्येक लढाऊ विमानाची क्षमता वेगवेगळी आहे. या लढाऊ विमानांच्या यादीत सुखोई सु-30 एमकेआय, राफेल, तेजस, मिग 29, मिराज 2000, जगुआर आणि मिग 21 यासारख्या विमानांचा समावेश आहे. या आर्थिक वर्षात हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडला अशाप्रकारची 12 इंजिन कंपनीकडून मिळण्याची अपेक्षा आहे. भारताला दुसरे जीई 404 इंजिन मिळाले आहे. भारतीय हवाई दलाने 83 एलसीए मार्क 1 ए लढाऊ विमानांची ऑर्डर ( Jet Engine Deal India ) दिली होती.
संरक्षण मंत्रालयाचे सचिव राजेश सिंह यांनी म्हटले की, भारताने तेजस मार्क 1 ए लढाऊ विमानांसाठी जीई एफ 404-आयएन 20 इंजिनाची आयात पुन्हा सुरू केली आहे. जीई मार्च 2026 पासून प्रत्येक महिन्याला 2 इंजिन पाठवू शकते. भारताने जनरल इलेक्ट्रिकसोबत 761 मिलियन डॉलरचा करार केला होता. त्या अंतर्गत लढाऊ विमानांसाठी इंजिन खरेदी केले जात आहेत. अलीकडेच महिंद्रा ग्रुपची महिंद्रा डिफेन्स सिस्टिम आणि ब्राझीलची मोठी एअरोस्पेस कंपनी एम्ब्रेअर यांच्यात मोठी संरक्षण डील झाली आहे. यात हवाई दलासाठी दारुगोळा, शस्त्रे आणि जवानांना ने-आण करण्यासाठी सी-390 मिलेनियम हे मध्यम मालवाहू विमान भारतात तयार केले जाणार आहे. याचबरोबर दोन्ही देश टेहाळणी आणि कमांड सेंटर असलेली अवाक्स प्रणालीची विमाने बनविण्यासही सहकार्य ( Jet Engine Deal India ) करणार आहेत.