Soldier Train Assault : धावत्या रेल्वे गाडीत रक्तरंजित थरार ! सैनिकावर ब्लेडने जीवघेणा हल्ला

Top Trending News    15-Jul-2025
Total Views |

train ass
 
नागपूर :  ( Soldier Train Assault ) अहमदाबादहून हावडाकडे जाणा-या 12833 एक्सप्रेस ट्रेनमध्ये सीटवरून दोन प्रवाशांमध्ये खूप मोठा वाद झाला. या झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले आहे. हे सर्व प्रकरण खूप चिरघळले आहे. छत्तीसगडचा रहिवासी असलेला भारतीय सैनिक नरेश कुमार वर्मा त्याच्या आरक्षित सीटवर प्रवास करत होता. दरम्यान, ट्रेन धामणगाव स्टेशनवरून निघाली तेव्हा आशिष नावाचा दुसरा प्रवासी मुद्दाम येऊन वर्मा यांच्या आरक्षित सीटवर बसला. वर्मा यांनी त्यांना उठण्याची विनंती केली तेव्हा दोघांमध्ये वाद झाला.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ट्रेनच्या एस-1 कोचमध्ये घडली. वाद इतका वाढला की आशिषने अचानक खिशातून ब्लेड काढली आणि वर्मा यांच्यावर हल्ला केला. ज्यामुळे सैनिकाच्या शरीरावर जखमा झाल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून जखमी प्रवाशानेही आरोपींना बेदम मारहाण केली. या घटनेत दोघेही जखमी झाले असून पुलगाव स्थानकावर दोघांनाही ट्रेनमधून ( Soldier Train Assault ) खाली उतरवण्यात आले.
 
हल्ल्याने संतापलेल्या वर्मा यांनीही प्रत्युत्तर देत आशिष यांना मारहाण केली. भांडणात आशिषच्या डोक्याला दुखापत झाली त्यामुळे रक्तस्त्राव होऊ लागला. या घटनेमुळे डब्यातील इतर प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. काही प्रवाशांनी तात्काळ रेल्वे गार्ड आणि आरपीएफला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पुलगाव स्थानकावर आरपीएफ जवान तैनात झाले आणि ट्रेन तिथे पोहोचताच दोन्ही जखमींना ट्रेनमधून खाली उतरविले. प्राथमिक उपचारानंतर दोघांनाही रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तपास सुरू आहे.