Gandhi Portrait Auction : 94 वर्षांपूर्वीचं गांधींचं दुर्मिळ चित्र 1.7 कोटींना विकले ! ब्रिटिश कलाकाराची विलक्षण भेट

Top Trending News    17-Jul-2025
Total Views |

gandhi
 
दिल्ली : ( Gandhi Portrait Auction ) लंडनच्या बोनहॅम्समध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका ऑनलाइन लिलावात महात्मा गांधींच्या एका अत्यंत दुर्मिळ चित्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या लिलावात सुंदर तैलचित्राचे तब्बल 1,52,800 पाउंड म्हणजेच जवळपास 1.7 कोटी रुपये इतकी किंमत मिळाली. ही रक्कम चित्राच्या अंदाजित किमतीच्या तिप्पट होती. चित्राची खास गोष्ट म्हणजे हे एकमेव चित्र आहे ज्यासाठी महात्मा गांधी स्वतः पोर्ट्रेट मोडमध्ये बसले होते. चित्रकाराने त्यांच्या समोर बसून हे अप्रतिम तैलचित्र साकारले होते. यामुळेच या चित्राचे ऐतिहासिक महत्त्व अनमोल आहे.
 
ब्रिटिश कलाकार क्लेअर लाइटॉन यांनी काढलेल्या या चित्राला 'पोर्ट्रेट ऑफ महात्मा गांधी' असे नाव दिले होते. लाइटॉन कुटुंबियांना या चित्रासाठी 57-80 लाख रुपयांच्या आसपास किंमत मिळेल, असे वाटत होते, पण या चित्राने 1.7 कोटींचा टप्पा गाठून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. लाइटॉन कुटुंबीयांच्या माहितीनुसार, हे चित्र 1974 मध्ये एका सार्वजनिक प्रदर्शनात ठेवले होते. त्यावेळी एका कार्यकर्त्यांने या चित्रावर हल्ला केला होता. त्यानंतर या चित्राची दुरुस्ती करण्यात आली. या घटनेमुळेच लाइटॉन कुटुंबीयांना हे चित्र इतक्या मोठ्या किमतीत विकल्या जाईल, अशी अपेक्षा ( Gandhi Portrait Auction ) नव्हती.