Honey Trap Exposed : पटोले यांनी दाखवला हनी ट्रॅपचा पेन ड्राइव्ह ! सापळ्यात अडकले 72 हून अधिक अधिकारी आणि मंत्री

Top Trending News    17-Jul-2025
Total Views |
 
honey trap
 
मुंबई : ( Honey Trap Exposed ) महाराष्ट्राच्या राजकारण सध्या वेगळ्याच वळणावर जात आहे. सध्या हनी ट्रॅपचा मुद्दा खूपच तापला आहे. गुरुवारी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत हनी ट्रॅपचा पेन ड्राइव्ह दाखवून एक मोठा धक्काच दिला आहे. त्यांनी संगितले की या पेन ड्राइव्हमध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कारनामे कैद आहेत. यानंतर, सभागृहात सर्वत्र खळबळ माजली होती. सलग दुसऱ्या दिवशी पटोले यांनी सभागृहात हनी ट्रॅपचा मुद्दा उपस्थित केला. विधानसभा अध्यक्षांनी महायुती सरकारला या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले तर, शुक्रवारी अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहाला माहिती देण्याची विनंती केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कारवाईचे आश्वासन दिले आहे. परंतु, विरोधकांनी या संवेदनशील मुद्द्यावर सरकार हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप केला. विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभागृहावर बहिष्कार टाकला ( Honey Trap Exposed ) आहे.
 
नाना पटोले पुढे म्हणाले की, या हनी ट्रॅपशी संबंधित सर्व पुरावे माझ्याकडे पेन ड्राइव्हमध्ये ( Honey Trap Exposed ) आहेत. आम्हाला कोणाचेही वैयक्तिक चारित्र्य बदनाम करायचे नाही, म्हणून ते आतापर्यंत सार्वजनिक केलेले नाही. सरकारने कारवाई केली नाही तर विरोधकांना ते जनतेसमोर आणावे लागेल. नाशिक, ठाणे आणि मंत्रालय हे हनी ट्रॅपचे केंद्र बनले आहेत असा आरोपही पटोले यांनी केला. आमच्याकडे एक पेन ड्राइव्ह आहे, ज्यामध्ये या प्रकरणात काही भाजपा नेत्यांचा सहभाग असल्याचे पुरावे आहेत. त्यांनी पेन ड्राइव्हमध्ये असलेली माहिती स्पष्ट केली नाही. परंतु त्यात महत्त्वाचे पुरावे असल्याचा दावा केला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हनी ट्रॅपचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला. त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गोपनीय सरकारी फायली आणि माहिती हनीट्रॅपद्वारे लीक झाली आहे. दानवे यांनी या संदर्भात कठोर कारवाई करण्याची मागणी ( Honey Trap Exposed ) सरकारने केली.
 
असे उघड झाले प्रकरण ?
 
ठाणे आणि नाशिकमधील काही महिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण सुरू झाले. हनी ट्रॅपचे जाळे मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये पसरलेले आहे. राज्यातील एकूण 72 सरकारी अधिकारी या हनी ट्रॅपमध्ये अडकले असल्याचा आरोप आहे. यामध्ये राज्यातील सात वर्ग एक प्रशासकीय अधिकारी, सनदी अधिकारी, माजी आणि विद्यमान मंत्री, तीन डीसीपी म्हणजेच पोलिस आयुक्त, काही महसूल अधिकारी, पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस आयुक्त ( Honey Trap Exposed ) यांचा समावेश आहे.
 
सूत्रांनुसार, या संपूर्ण सापळ्याची सुरुवात नाशिकमधील एक पंचतारांकित हॉटेलमधून झाली आहे. लोकांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवणाऱ्या या महिलेला 2016 मध्ये पोलिसांनी पकडले होते. ती स्वतःला विधवा आहे असे सांगते. मदत मागण्याच्या नावाखाली लोकांना तिच्या जाळ्यात अडकवल्यानंतर ती गुप्तपणे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करते. त्यानंतर व्हिडिओ दाखवून त्यांना बदनाम करण्याची धमकी देते. व्हिडिओच्या बदल्यात 40 लाख रुपयांपर्यंतची मागणी करण्यात आली. उत्तर महाराष्ट्रातील एका मंत्र्याच्या जवळचा अधिकारीही या महिलेच्या जाळ्यात अडकल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले ( Honey Trap Exposed ) आहेत.