Luxury City Index : जगातल्या टॉप महागड्या शहरांत भारताचं ‘हे’ शहर कसं पोहोचलं ?

17 Jul 2025 15:28:48
 
luxary
 
दिल्ली : ( Luxury City Index ) ज्युलियस बेअर ग्रुपने त्यांची नवीन रँकिंग जाहीर केली असून यात जगातील सर्वात आलिशान आणि महागड्या शहरांबाबतच्या रिपोर्ट आहेत. या रिपोर्टनुसार कार आणि महिलांच्या हँडबॅग्जच्या बाबतीतही सिंगापूर अव्वल, तर महिलांच्या शूजच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी, मालमत्ता आणि आरोग्यसेवेच्या बाबतीत सिंगापुर शहर अख्ख्या जगात तिसरे आहे. या यादीत लंडन दुसऱ्या स्थानावर आहे, जिथे खाजगी शाळांच्या शिक्षणात 26.6% वाढ झाली आहे. बिझनेस क्लास फ्लाइटच्या किंमतीत 29.7% वाढ नोंदवली गेली आहे. तसेच हॉटेलच्या किमतींमध्ये 26.1 टक्के वाढ झाल्याने हाँगकाँग यादीत तिसऱ्या स्थानावर ( Luxury City Index ) आहे.
 
ज्युलियस बेअर ग्लोबल वेल्थ अँड लाइफस्टाइल रिपोर्ट 2025 नुसार सिंगापूर, लंडन, मुंबई आणि इतर काही प्रसिद्ध शहरे जगातील सर्वात आलिशान आणि महागडे शहर आहेत. स्विस बँकेच्या ज्युलियस बेअरच्या नवीन रँकिंगमध्ये सिंगापूर सर्वात महागडे शहर म्हणून अव्वल ठरले आहे. लंडन आणि हाँगकाँगला मागे टाकत सिंगापूर सलग तिसऱ्या वर्षी अव्वल ठरले आहे. ज्युलियस बेअर म्हणाले की आर्थिक अनिश्चितता, वाढते व्याजदर आणि वाढत्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक लक्झरी लँडस्केपवर परिणाम होत आहे. तरीही काही शहरांनी आपले स्थान निर्माण केले आहे. जसे की दुबई, जे पाचव्या स्थानावरून सातव्या स्थानावर ( Luxury City Index ) पोहोचले आहे.
 
जगातील सर्वात महागड्या आणि आलिशान शहरांच्या यादीत टॉप 20 शहरांपैकी आठ आशियातील आहेत. सिंगापूर, हाँगकाँग (तिसरे), शांघाय (सहावे) त्यानंतर बँकॉक, टोकियो, जकार्ता, मुंबई आणि मनिला यांचाही समावेश आहे. हाँगकाँग (गेल्या वर्षी दुसऱ्या क्रमांकावर) आणि शांघाय (गेल्या वर्षी चौथे) या वेळी क्रमवारीत घसरण झाली आहे. मुंबईतील लोक विमान प्रवास (42%) आणि रेस्टॉरंटमध्ये जेवण्यावर (44%) सर्वाधिक खर्च करतात. तसेच, हॉटेलमध्ये राहण्याचा आणि लक्झरी वस्तू खरेदीवर 12 आणि 9 टक्के आहे. आशियामध्ये, सुमारे 13% लोक बिझनेस क्लासमध्ये प्रवास करणे ( Luxury City Index ) पसंत करतात.
 
 
Powered By Sangraha 9.0