वॉशिंग्टन: ( Trump Health Mystery ) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोग्याबद्दल गुरुवारी व्हाईट हाऊसने एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. व्हाईट हाऊसच्या डॉक्टरांनी सांगितले की ट्रम्प यांची या समस्येबाबत पूर्ण गांभीर्याने तपासणी करण्यात आली आहे. अनेक पैलू विचारात घेण्यात आले आहेत. यामध्ये पायांच्या डॉपलर अल्ट्रासाऊंडचा देखील समावेश होता. ज्यामध्ये ही स्थिती गंभीर नसून एक सामान्य आणि सौम्य समस्या असल्याचे दिसून आले. महत्वपूर्ण बाब म्हणजे तपासणीत डीप व्हेन थ्रोम्बोसिस किंवा कोणत्याही धमनी रोगाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत.
ट्रम्प यांना अलीकडेच क्रॉनिक व्हेनस इनसफीशियन्सी नावाच्या आजाराचे निदान झाले आहे. हा आजार वृद्धांमध्ये सामान्य आहे. यामध्ये पायांच्या नसांमध्ये रक्त साचू लागते आणि रक्त प्रवाह सामान्य होत नाही. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांना पायांच्या खालच्या भागात थोडीशी सूज जाणवली, त्यानंतर त्यांनी वैद्यकीय तपासणी केली आणि हे निदान झाले. प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनीही ट्रम्प यांच्या आरोग्याबद्दल सांगितले. अलिकडेच ट्रम्प यांचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये त्यांच्या हाताच्या मागील बाजूस एक खूण दिसत होती. त्यावर मेकअप लावला होता, पण तो त्वचेच्या रंगापेक्षा वेगळा दिसत ( Trump Health Mystery ) होता.
याबद्दल विचारले असता लेविट म्हणाले की, हे खूण वारंवार हस्तांदोलन आणि अॅवस्पिरिन घेतल्याने त्वचेवर होणाऱ्या सौम्य जळजळीचा परिणाम आहे. ट्रम्प हृदयरोग आणि स्ट्रोक टाळण्यासाठी दररोज अॅिस्पिरिन घेतात, जी एक सामान्य वैद्यकीय पद्धत आहे. अशा परिस्थितीत, सौम्य जळजळ आणि दुखापत यासारखी लक्षणे अॅतस्पिरिनचे ( Trump Health Mystery ) सामान्य आणि सौम्य दुष्परिणाम मानले जातात.