Court Verdict : 'आय लव्ह यू' म्हणणं म्हणजे गुन्हा नाही ! कोर्टाचा धक्कादायक निकाल

Top Trending News    02-Jul-2025
Total Views |
 
court ve
 
नागपूर : ( Court Verdict ) ’आय लव्ह यू’ म्हणणे ही केवळ भावनांची अभिव्यक्ती आहे आणि त्यात ’लैंगिक हेतू’ नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने म्हटले आहे. 17 वर्षीय मुलीची छेडखानी केल्याच्या आराेपाखाली 33 वर्षीय युवकाची निर्दाेष मुक्तता करण्यात आली आहे. काेणत्याही लैंगिक कृत्यामध्ये अनुचित स्पर्श, जबरदस्तीने कपडे उतरवणे, अश्लील हावभाव किंवा महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या उद्देशाने केलेली टिप्पणी यांचा समावेश आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती उर्मिला जाेशी-वाळके यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशात नोंदवले आहे.
 
नागपूरमध्ये राहणाऱ्या आराेपी युवकाने त्याच्या ओळखीच्या 17 वर्षीय मुलीला मारहाण केली, तिचा हात धरला आणि ’आय लव्ह यू’ म्हटले. नागपूरमधील सत्र न्यायालयाने 2017 मध्ये त्याला भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पाेक्साे) कायद्याच्या संबंधित कलमांखाली दाेषी ठरवले आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयाने त्या युवकाची शिक्षा रद्द केली. आदेशात नाेंदविले की, पीडित मुलीशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचा त्याचा हेतू दर्शविणारी काेणताही हेतू नव्हता. ‘मी तुझ्यावर प्रेम करताे’ असे उच्चारलेले शब्द केवळ लैंगिक ( Court Verdict ) हेतू मानू शकत नाहीत.
 
फिर्यादी मुलीच्या तक्रारीनुसार, मुलगी शाळेतून घरी परतत असताना युवकाने तिला ( Court Verdict ) अडविले. तिचा हात पकडला आणि नाव विचारले. तिने न सांगितल्यामुळे तिच्या थापड मारली. ‘आय लव्ह यू‘ असे म्हटले. त्यानंतर मुलगी तेथून निघून गेली. तिने घरी जाऊन तिच्या वडिलांना घटनेबद्दल सांगितले. वडिलांनी तिला पोलीस ठाण्यात नेले. पाेलिसांत तक्रार केली. पाेलिसांनी त्या युवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पाेलिसांनी तपास करुन आराेपपत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा न्यायालयाने आराेपी युवकाला 3 वर्षे कारावासाची शिक्षा सुणावली हाेती. त्याने शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले.
 
न्यायालयाने नोंदवले निरीक्षण
 
उच्च न्यायालयाने म्हटले की हा खटला विनयभंग किंवा लैंगिक छळाच्या कक्षेत येत नाही. काेणत्याही लैंगिक कृत्यामध्ये अनुचित स्पर्श, जबरदस्तीने कपडे उतरवणे, अश्लील हावभाव किंवा महिलेच्या विनयाचा अपमान करण्याच्या उद्देशाने केलेली टिप्पणी यांचा समावेश आहे, असे न्यायालयाने म्हटले. या प्रकरणात, आराेपीने लैंगिक हेतूने ’आय लव्ह यू’ म्हटले हाेते हे सिद्ध करणारा काेणताही पुरावा नाही, असे हायकाेर्टाने म्हटले आहे. ‘जर काेणी असे म्हणत असेल की ताे दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करताे किंवा त्याच्या भावना व्यक्त करताे तर ते स्वतःच एखाद्या प्रकारचा लैंगिक हेतू दर्शविणारा हेतू ठरणार नाही,‘ असे आदेशात ( Court Verdict ) म्हटले आहे.