Obama Arrest Hoax : बराक ओबामांना अटक ? ट्रम्पने शेअर केला धक्कादायक एआय व्हिडीओ !

21 Jul 2025 23:15:43

bara 
 वॉशिंग्टन : ( Obama Arrest Hoax ) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या अटकेचा एआय-जनरेटेड व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामुळे सर्वत्र खळबळजनक माजली आहे. ट्रम्प यांनी शेअर केलेला एआय व्हिडिओ कितपत खरा आहे, यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. काही आठवड्यांपूर्वी ट्रम्प यांनी ओबामा प्रशासनावर 2016 च्या निवडणुकीत घोटाळ्याचा कट रचल्याचा आरोप केला होता.
 
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांनीही ट्रम्पवर 2016 च्या निवडणुकीत छेडछाड केल्याचा आरोप केला होता. गॅबार्ड म्हणाल्या की, ओबामा आणि त्यांच्या प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिळून देशद्रोहाचा कट रचला होता. त्यांच्या आरोपाचा रोष 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांचा विजय रशियाच्या मदतीने झाला हे सिद्ध करणे होता. निवडणुकीत ट्रम्प यांच्या विजयानंतर ओबामा आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक सत्तापालट करण्याची योजना ( Obama Arrest Hoax ) आखली.
 
कायदा सर्वोच्च
 
व्हिडिओची सुरुवात ओबामा ( Obama Arrest Hoax ) यांच्या एका जुन्या विधानाने होते, ज्यात ते म्हणतात, कोणीही, विशेषतः राष्ट्रपती, कायद्याच्या वर नाही. यानंतर, अनेक डेमोक्रॅटिक नेत्यांच्या क्लिप्स जोडल्या गेल्या आहेत, ज्यात जो बायडेन यांचा समावेश आहे, जे पुनरावृत्ती करतात - कायद्याच्या वर कोणीही नाही. हा व्हिडिओ अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांच्या विधानाच्या काही दिवसांनंतर आला आहे. यामध्ये, त्यांनी म्हटले होते की 2016 मध्ये ट्रम्प यांच्या अमेरिकन अध्यक्षीय विजयात रशियन प्रभावाच्या दाव्यांवरून ओबामा प्रशासनावर खटला चालवला पाहिजे.
 
या व्हायरल व्हिडिओमध्ये बराक ओबामा यांना व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये एफबीआय एजंट्सकडून अटक केल्याचे दाखवण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये ओबामा ट्रम्प यांच्या शेजारी बसलेले दाखवले आहेत. यानंतर, 3 एजंट येतात आणि ओबामा यांना कॉलरने पकडून खाली पाडतात. त्यानंतर, ते ओबामांना खाली ढकलतात आणि त्यांना बेड्या घालतात. जवळ बसलेले ट्रम्प हे सर्व पाहून हसत आहेत. व्हिडिओच्या शेवटी, ओबामा तुरुंगाच्या गणवेशात ( Obama Arrest Hoax ) एका कोठडीत दिसत आहेत.
 
लोकशाहीसाठी धोकादायक
 
ट्रम्प यांनी हा व्हिडिओ बनावट असल्याचे कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यांनी असे म्हटले नाही की, हे फक्त एक काल्पनिक दृश्य आहे. या व्हिडिओमुळे ट्रम्प यांच्यावर बरीच टीका होत आहे. अनेकांचे असे म्हणणे आहे की बनावट व्हिडिओ शेअर करणारे राष्ट्रपती लोकशाहीसाठी धोकादायक ठरू शकतात. काही जाणकार असेही म्हणतात की हा एपस्टाईन प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे.
Powered By Sangraha 9.0