Honey trap Scandal : हनीट्रॅप प्रकरणात भाजप कनेक्शन ? संशयाचे सावट गडद

22 Jul 2025 13:33:59

Honey trap
 
मुंबई : ( Honey trap Scandal ) राजकारणात खळबळ उडवणाऱ्या हनीट्रॅप प्रकरणात आता भाजप नेत्यांच नाव पुढे येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्रात वाढत्या हनीट्रॅप प्रकरणांवरुन गंभीर आरोप केले आहेत.
 
खडसे यांनी जळगावातील भाजपा कार्यकर्ता प्रफुल्ल लोढा याच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांवरुन थेट गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री कार्यालयातील रामेश्वर नाईक यांच्यावर निशाणा साधला आहे. खडसे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी केली आहे. खडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, प्रफुल्ल लोढा याच्यावर साकीनाका आणि अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल ( Honey trap Scandal ) झाले आहेत.
 
अल्पवयीन मुलींवर बलात्कार, छळ, ब्लॅकमेलिंग आणि हनीट्रॅपशी संबंधित आरोपांचा समावेश आहे. खडसे यांनी प्रश्न केला की, प्रफुल्ल लोढा हा कोण आहे ? त्यांनी सांगितले की, लोढा हा पूर्वी काँग्रेस, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता भाजपाचा कार्यकर्ता आहे. त्याचा भाजपमधील प्रवेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला असून, यावेळी रामेश्वर नाईक उपस्थित ( Honey trap Scandal ) होते.
 
खडसे यांनी सांगितले की, गेल्या वर्षी प्रफुल्ल लोढा याने गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. लोढा आणि महाजन यांचे पूर्वी चांगले संबंध होते, परंतु तक्रारीनंतर लोढाने रामेश्वर नाईक यांच्याकडून जिवे मारण्याची धमकी मिळाल्याचा दावा केला आहे. खडसे यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलीस करू शकणार नाहीत, असे सांगत एसआयटीमार्फत चौकशीची मागणी केली आहे. तसेच, त्यांनी प्रफुल्ल लोढाचा एक व्हिडीओ शेअर करत आपले आरोप बळकट केले आहेत.
Powered By Sangraha 9.0