Gold Smuggling : २० किलो सोने… शरीर बनलं स्मगलिंगचं हत्यार !

23 Jul 2025 14:39:56

 Gold Smuggling  
 
सुरत : ( Gold Smuggling ) गुजरातमधील सुरत विमानतळावर दुबईहून परतणाऱ्या एका जोडप्याने कहरच केला आहे. त्यांच्याकडून तब्बल २० किलोपेक्षा जास्त सोन जप्त करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरत विमानतळाच्या इतिहासातील ही कदाचित सर्वात मोठी सोन्याची जप्ती आहे. या जोडप्याने अतिशय चलाखीने त्यांच्या शरीरावर सोने लपवले होते. अशी सर्व परिस्थिती असतांना सीआयएसएफ जवानाला त्याचा सुगावा लागला. त्यामुळे, सीआयएसएफ जवानाच्या संशयामुळे सुरक्षा अधिकाऱ्याने विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांना ( Gold Smuggling ) माहिती दिली.
 
दोघेही गुजरातचे रहिवासी ( Gold Smuggling ) आहेत. अधिकाऱ्याला त्यांची चालण्याची पद्धत थोडी विचित्र वाटत होती. त्यांच्या पोटावर फुगवटाही होता. यामुळे, त्यांच्या चालण्याची आणि शरीराची रचना सामान्य लोकांसारखी दिसत नसल्याने काहीतरी गडबड असावी, असा संशय अधिकच वाढला. एअर इंडियाच्या विमानातून उतरताना सीआयएसएफच्या गुप्तचर शाखेतील सध्या वेशातील अधिकाऱ्याने हे जोडपे पाहिले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवले. त्यानंतर, जोडप्याची झडती घेण्यात आली. त्या पुरूषाने शर्ट आणि पॅन्ट घातली होती, तर महिलेने सलवार सूट घातला होता. अधिकाऱ्याने सांगितले की, त्याच्या शरीराच्या मध्यभागी आणि धडाच्या वरच्या भागावर एकूण २८ किलो सोन्याचा मुलामा व्यवस्थित बांधण्यात आला होता, जेणेकरून त्याच्या शरीराच्या आकारात ते साकार करून तस्करी करता येईल.
 
 
Powered By Sangraha 9.0