Student Assault : अख्खा विदर्भ हादरला, मित्राच्या खोलीवर आणि शेतात नेऊन 10 नराधमांचा विद्यार्थिनीवर...

23 Jul 2025 11:17:08

Student Assault 
 नागपूर : ( Student Assault ) शहरातील एका महाविद्यालयातून बी.ए. प्रथम वर्षाचे शिक्षण घेत असलेली साडे सतरा वर्षांची मुलगी 11 जुलै रोजी ती अचानक घरुन निघून गेली. पालकांच्या तक्रारीनंतर हुडकेश्वर पोलिसांनी तिला 3 तासातच शोधून पालकांच्या ताब्यात दिले. मात्र 16 जुलै रोजी ती पुन्हा बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र, ती कुठेच मिळून आली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी हुडकेश्वर ठाण्यात तक्रार दिली.
 
तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तपासात ती नागपूरच्याच दोन मित्रांच्या संपर्कात आल्याचे उघड झाले. ते तिला निर्जन स्थळी घेवून गेले. तिच्यावर अत्याचार केला नंतर सोडून दिले. त्याच दिवशी ती यवतमाळला गेली. अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस पथक तिचा शोध घेत होते. ती यवतमाळच्या मादणी येथे असल्याची माहिती पोलिस पथकाला ( Student Assault ) मिळाली.
 
पीडित मुलीचे कुटुंब आणि हुडकेश्वर पोलिस 18 जुलै रोजी यवतमाळला गेले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिला ताब्यात घेतले आणि त्याच दिवशी नागपुरात परतले.
 
पीडितेने महिला अधिकाऱ्यासमोर आपबिती सांगितली आणि अक्खी यंत्रणा हादरली. कारण 10 युवकांनी सामूहिक अत्याचार ( Student Assault ) केल्याची खळबळजनक माहिती तिने दिली होती. पोलिसांनी तिचे बयान नोंदवून घेतले. त्यावरून सामूहिक अत्याचार, पीटा अॅक्ट आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. तत्पूर्वी पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वपोनि भेदोडकर यांच्या पथकाने चोवीस तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या. नागपुरातील दोन आणि यवतमाळातील चार असे 6 आरोपी अटक केले. त्यांना न्यायालयाने 24 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान पोलिस आरोपींचा तपास करत आहेत.
 
यवतमाळात 2 दिवस अत्याचार
 
जवळपास वर्षभरापूर्वी पीडितेची यवतमाळच्या एका तरुणाशी इंस्टाग्रामवरून ओळख झाली. दोघांनीही एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि बोलचाल सुरू झाली. आरोपी तरुणाने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर त्याने तिला भेटण्यासाठी यवतमाळला बोलाविले. 16 जुलै रोजी ती त्याच्याकडे गेली. तो तिला मादणी येथे मित्राच्या खोलीवर घेऊन गेला. तत्पूर्वी त्याने इतर मित्रांनाही याबाबत माहिती दिली होती. तेथे चौघांनी मिळून पीडितेवर आळीपाळीने अत्याचार केला. तिने प्रतिकार केला असता मारहाणही केली. दुसऱ्या दिवशी यवतमाळ जवळील एका शेतात तिला घेवून गेले. तेथेही इतर 4 आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार ( Student Assault ) केला.
 
 
Powered By Sangraha 9.0