NSDL IPO Alert : NSDL चा भव्य IPO ! 4000 कोटींचा टार्गेट, गुंतवणुकीची सुवर्णसंधी की धोका ?

24 Jul 2025 15:01:03
 
 NSDL
 
नवी दिल्ली : ( NSDL IPO Alert ) भारताच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा असलेल्या NSDL (National Securities Depository Limited) कंपनीचा IPO हा 30 जुलैपासून सर्वांसाठी खुला होणार आहे. या IPO साठी तब्बल 4000 कोटी रुपये उभारण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गुंतवणूकदारांमध्ये याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. हा IPO मोठा फायदा करून देणारा ठरेल की जोखमींचा ठरेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) चा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (IPO) 30 जुलै रोजी उघडेल. IPO दस्तऐवजानुसार, तो 1 ऑगस्ट रोजी संपेल. मोठे (अँकर) गुंतवणूकदार 29 जुलै रोजी त्यासाठी बोली लावू शकतील. हा IPO 5.01 कोटी शेअर्सच्या विक्री ऑफर (OFS) वर आधारित आहे आणि त्यात कोणतेही नवीन शेअर्स जारी केले जाणार ( NSDL IPO Alert ) नाहीत.
 
नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE), स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), HDFC बँक, IDBI बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे स्पेसिफाइड अंडरटेकिंगचे प्रशासक (SUUTI) त्यांचे शेअर्स विकत आहेत. बाजारातील सूत्रांनी IPO चा आकार सुमारे 4,000 कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवला आहे. ICICI सिक्युरिटीज, अॅक्सिस कॅपिटल, HSBC सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया), आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स अँड सिक्युरिटीज, मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स हे या इश्यूचे व्यवस्थापक ( NSDL IPO Alert ) आहेत.
Powered By Sangraha 9.0