दिल्ली : ( RSS Muslim Meet ) गेल्या 100 वर्षात पहिल्यांदाच आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी गुरुवारी मुस्लिम धर्मगुरूंसोबत बैठा झाली. ही बैठक हरयाणा भवन येथे 40 मुस्लिम धार्मिक नेत्यांसोबत झाली. ही बैठक अडीच तासांहून अधिक काळ चालली. अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख उमर अहमद इलियासी यांच्यासह अनेक मुस्लिम धार्मिक नेते बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत उपस्थित असलेले मुस्लिम विचारवंत फिरोज बख्त म्हणाले की, आरएसएसने असे मुस्लिम चेहरे पुढे आणावेत जे मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी सतत काम करत आहेत आणि ज्यांच्यावर मुस्लिमांचा विश्वास आहे. बख्त म्हणाले की, भागवत यांनी स्वतः म्हटले होते की भारतातील हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच आहे. वक्फ बोर्डात सुधारणा करणे हे खूप मोठे आणि चांगले पाऊल आहे. ही बैठक इतर समुदायांशी समेट करण्याच्या आरएसएसच्या ( RSS Muslim Meet ) प्रयत्नांचा एक भाग होती.
आरएसएस प्रमुखांशी ( RSS Muslim Meet ) झालेल्या भेटीनंतर, लखनौहून आलेले तीले वली मशिदीचे शाही इमाम मौलाना सय्यद फजलुल्लाह मन्नान रहमानी म्हणाले की, गेल्या 100 वर्षात आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यासोबत अशी बैठक कधीच झाली नव्हती. ते म्हणाले की, सर्व मुद्द्यांवर ज्या सुसंवादी वातावरणात चर्चा झाली आणि ज्या पद्धतीने आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी संयमाने सर्वांचे म्हणणे ऐकले ते खरंच कौतुकास्पद आहे. ते म्हणाले की, प्रत्येक राज्यात वेळोवेळी अशा बैठका घेतल्या पाहिजेत यावर सर्वांचे एकमत आहे. भागवत यांच्यासोबत, राष्ट्रीय मुस्लिम मंचचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे आणि इंद्रेश कुमार यांनीही या बैठकीत भाग घेतला होता.
या बैठकीपूर्वी, आरएसएस प्रमुख मोहन भागवत ( RSS Muslim Meet ) म्हणाले होते की, भारतातील पंथांचे वेगवेगळे तत्वज्ञान आहे. पण त्यानंतरही ते कोणत्याही भांडणाशिवाय चालू आहे. आपल्यात वादविवाद होतो पण भांडण होत नाही. हेच कारण आहे की देशात पंथ वेगवेगळे असले तरी आरएसएसचा दृष्टिकोन एक आहे. अनेक वेळा विरोधाभास असतात, आचरण आणि विचारसरणीत फरक असतो, परंतु संपूर्ण देश एकाच दृष्टिकोनाने पुढे गेला आहे, आम्ही आमचे शिक्षण किंवा धोरणे लादून कधीही बदल घडवून आणला नाही, ही भारतीय पद्धत आहे.