नागपूर : ( Shravan Somwar ) ‘हर हर महादेव’च्या गजरासह मराठी भाषिकांचा श्रावण शुक्रवारपासून सुरू झाला असून उद्या पहिला श्रावण सोमवार आहे. यानिमित्त भगवान शंकर यांच्या अभिषेकासाठी भाविकांची तयारीही अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. उद्या पहाटेपासून शिव मंदिरांमध्ये ओम नम: शिवायचा जप अन् महादेवाची गाणी ऐकायला येणार आहे. पहिला श्रावण असल्याने महिलांची मोठी गर्दी मंदिरांमध्ये उसळणार आहे. त्यामुळे मंदिरांमध्ये विश्वस्त व व्यवस्थापन समितीने त्या अनुषंगाने स्वयंसेवकानाही सज्ज राहण्यास सांगितले. एकूणच मंदिरांमध्ये ( Shravan Somwar ) उद्या शिव लिंगाच्या पूजेसाठी रांगा दिसून येण्याची शक्यता आहे.
श्रावण ( Shravan Somwar ) लागल्यापासून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त हा उत्साह मंदिरांमधून द्विगुणित झाल्याचे दिसून येणार आहे. महाल मधील कल्याणेश्वर मंदिर, नंदनवनमधील भोलेनाथ मंदिर, मानकापूरमधील प्राचीन शिव मंदिर, तेलनखेडीमधील शिवमंदिर, बर्डी मधील शिवालय, सोनेगाव मधील शिव मंदिर, रवी नगर मधील शिव मंदिर यासह शहरातील इतर शिव मंदिरांमध्ये भक्तांच्या दर्शन आणि शिव अभिषेकसाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे. भक्तांच्या अभिषेक आणि पूजेसाठी मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे. रविवारी रात्री 12 वाजल्यानंतर सर्व स्वयंसेवक मंदिरात भक्तांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे. शहरातील शिव मंदिरांसह घराघरांत पहिल्या श्रावण सोमवारी करण्यात येणाऱ्या पूजेची तयारीही झाली आहे. शिव मंदिरांमध्ये सजावट, रोषणाई करण्यात आली आहे. शिवालये फुलांनी सजविण्याचे काम रविवारी सायंकाळपासून सुरू झाले.
भाविकांना रांगेत उभे राहून योग्य पद्धतीने दर्शन घ्यावे ( Shravan Somwar ) लागेल. काही मंदिरांमध्ये ज्येष्ठांच्या दर्शनासाठी स्वयंसेवकांकडून स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. श्रावण सोमवारी भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी मंदिर समित्यांनी सर्व तयारी केली आहे. शिव मंदिरांमध्ये पहाटे 4 वाजतापासून अभिषेक सुरू होतो. तेव्हापासून भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. श्रावणाच्या पहिल्या सोमवारनिमित्त महिलांमध्येही खूप उत्साह आहे. या वर्षी श्रावणात चार सोमवार असतील. त्यामुळे पूजेसाठी त्यांना चारच सोमवार मिळणार आहे. मागील वर्षी पाच सोमवार होते. यंदा पहिल्या सोमवार 28 तारखेला आहे आणि शेवटचा चौथा सोमवार 18 ऑगस्ट रोजी येतो.
केवळ चारच श्रावण सोमवार का ?
हिंदू पंचांगातील श्रावण महिन्याच्या ( Shravan Somwar ) सुरुवात व समाप्तीच्या तारखांवर अवलंबून असते. हिंदू कालगणनेनुसार, श्रावण महिना हा चंद्र मासांनुसार ठरतो आणि याची सुरुवात श्रावण कृष्ण प्रतिपदा पासून होते असते. त्यामुळे हा महिना दरवर्षी इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे वेगवेगळ्या तारखांना येतो. या यावर्षी, श्रावण महिना २५ जुलै २०२५ पासून सुरू होतो आणि २४ ऑगस्ट २०२५ रोजी संपतो. काही वर्षात श्रावण महिना ५ आठवड्यांपर्यंत वाढतो तेव्हा ५ श्रावण सोमवार येतात. पण २०२५ मध्ये श्रावण महिना तुलनेने थोडकाच आहे (२५ जुलै ते २४ ऑगस्ट), म्हणून फक्त ४ सोमवारच येतात.
श्रावण सोमवार
28 जुलै रोजी पहिला श्रावण सोमवार आहे. या दिवशी शिवलिंगावर मुठभर तांदूळ अर्पण करतात.
4 ऑगस्ट रोजी दुसरा श्रावण सोमवार असून दिवशी शिवलिंगावर मुठभर तीळ अर्पण करतात.
11 ऑगस्ट रोजी, तिसरा श्रावण सोमवार आहे. या दिवशी शिवलिंगावर मुठभर मूग अर्पण करतात.
18 ऑगस्ट रोजी, चौथा श्रावण सोमवार असून या दिवशी शिवलिंगावर मुठभर जव अर्पण करतात.