श्रावण महिन्याची ( Shravan Fasting ) सुरुवात अगदी जोमाने झाली आहे. श्रावणात विशेष महत्व मानले जाते ते उपवासाचा. ज्याला निसर्गोपचार पद्धती मध्ये लंघन असेल म्हटल्या जाते. सहसा श्रावण महिन्यातील फक्त सोमवारी उपवास केला जातो. बरेच लोक उपवास करतात पण दोन्ही वेळेस साबुदाण्याची खिचडी, राजगिरे पिठाची रोटी किंवा मोरदाण वगैरे खाऊन उपवास करतात. उपवास न ठेवणारे आणि तामसिक भोजन करणारेही बरेच लोक आहेत. प्रत्येकाच्या मनात प्रश्न असेल की उपवास नाही ठेवला तर काय होईल आणि ठेवलं तर फायदा काय होईल ? याबाबत जाणून घेऊया.
विशेष म्हणजे श्रावण महिन्यात ( Shravan Fasting ) खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण, या ऋतूत पचनशक्ती कमकुवत होते. या महिन्यात तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली तर तुम्ही निरोगी राहू शकता. आता जर तुम्ही श्रावण महिन्यात उपवास केला नाही तर नक्कीच एक दिवस तुमची पचनक्रिया मंद होईल. त्यांना जरा आराम देण्याची आवश्यकता आहे. फक्त तो उपवास जास्त खाऊन करू नये. उपवासात फलाहाराचे सेवन फारच महत्वाचे मानले जाते. तुम्ही फक्त फळे खाल्ल्यास निसर्गाला ज्या प्रकारे नवजीवन मिळते त्याचप्रमाणे तुमच्या शरीरातही तुम्हाला नवजीवन मिळू शकते.
उपवासाचा ( Shravan Fasting ) अर्थ उपाशी राहून शरीर पूर्णपणे कोरडे करणे असा नाही तर शरीराला काही काळ विश्रांती देणे आणि त्यातील विषारी घटक काढून टाकणे असा आहे. प्राणी, पक्षी आणि इतर सर्व प्राणी वेळोवेळी उपवास करून आपले शरीर निरोगी ठेवतात. शरीर निरोगी असले की मन आणि मेंदूही निरोगी होतात. त्यामुळे चातुर्मासातील काही विशेष दिवशी व्रत केले पाहिजे जे रोग आणि दुःख दूर करतात. म्हणूनच आयुर्वेदात उपवासाला फार महत्व दिले आहे.