Lay off Crisis : एका ट्विटने पेटला संघर्ष ! आयटी कपातीतून मध्यमवर्ग संकटात

31 Jul 2025 17:06:32

 Lay off Crisis
 
मुंबई : ( Lay off Crisis ) भारतातील सर्वांत मोठी आयटी सेवा कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमधील (टीसीएस) कपातीवर गुंतवणूकदार बसंत माहेश्वरी यांची आपली प्रतिक्रिया पुढे आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर टीका करत त्यांनी म्हटले, 2025-26 या आर्थिक वर्षात टीसीएस त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पुनर्रचनेमुळे ज्या 12,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. त्यांना आता 'मंदिर आणि मशीद' सारख्या धार्मिक मुद्यावर पोस्ट करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. विशेष म्हणजे आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात झाल्याचा सरळ प्रभाव भारतीय मध्यमवर्गावर पडत आहे. त्यामुळे या मोठ्या ( Lay off Crisis ) मध्यमवर्गाची संकटाकडे वाटचाल होत आहे.
 
त्यांनी पुढे लिहिले की, आता 12,000 टीसीएसके कर्मचाऱ्यांना मंदिर आणि मशीद यावर ट्विट करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल, असा त्यांचा कटाक्ष आहे. त्यांनी एक्सवरील त्यांच्या पोस्टद्वारे चुकीच्या प्राधान्यक्रमांवर टीका केली आहे. बरेच लोक इंटरनेटवर मंदिर आणि मशीदशी संबंधित मुद्यांवर बोलतात. म्हणून त्यांच्या मते, त्यांना 'जे हवे होते ते मिळाले'. या वरून असे जाणवते की टीसीएस मधील टाळेबंदी ही स्वतःहून घडवली जाते. ते पुढे म्हणाले की, मध्यमवर्गाला ( Lay off Crisis ) जसे हवे होते आणि त्यांना हेच मिळाले.
 
बसंत इथेच थांबले नाहीत. त्यांनी त्यांच्या पोस्टखाली आलेल्या कमेंट्स ला साडेआतोड प्रतिउत्तर दिले आहे. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने विचारले, 'आपण कुठे जात आहोत ?' यावर त्यांनी उत्तर दिले, 'अयोध्या.' 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर 'मंदिर वही बनायेंगे' च्या घोषणा देण्यात आल्या होत्या. तथापि, काही वापरकर्ते त्यांच्यावर टीकादेखील करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, 'तुम्ही खरोखर मध्यमवर्गाची थट्टा करत आहात का ? तुम्हाला इतके आत्मसंतुष्ट आणि आनंदी असण्याची लाज वाटली पाहिजे. दयनीय. एकाने त्यांना उत्तर दिले, 'तुमच्याकडे माझ्यासारखा पुरेसा वेळ आहे का ?'
 
टीसीएस ( Lay off Crisis ) त्यांच्या जागतिक कामगार संख्येत 2 टक्क्यांनी कपात करण्याची योजना आखत आहे. म्हणजेच या आर्थिक वर्षाच्या अखेरीस सुमारे 12,000 लोक बेरोजगार होतील. या टाळेबंदीचा परिणाम वरिष्ठ आणि मध्यम स्तरावरील पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होईल. कंपनीने एआयमुळे टाळेबंदी होत असल्याच्या अफवांनाही फेटाळून लावले आहे. टीसीएसने त्यांच्या बेंच पॉलिसीमध्ये बदल केल्यानंतर रेडिटरने धोक्याची घंटा वाजवल्यानंतर लगेचच ही टाळेबंदी करण्यात आली. धोरणानुसार, कर्मचाऱ्यांना वर्षात किमान 225 दिवस काम करावे लागते. म्हणजेच त्यांना क्लायंट प्रोजेक्टवर काम करावे लागते आणि ते निष्क्रिय बसलेले दिवस 35 पेक्षा जास्त नसावेत.
 
 
Powered By Sangraha 9.0