Wild Tadoba : ‘वाइल्ड ताडोबा’ची जंगलातून जागतिक झेप ! महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय सन्मान

Top Trending News    31-Jul-2025
Total Views |

Wild Tadoba
 
नागपूर : ( Wild Tadoba ) चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर सुब्बिया नल्लामुथु यांनी ‘वाइल्ड ताडोबा’ हा माहितीपट ताडोबातील निसर्गसौंदर्य आणि वन्‍यजीव संवर्धनचा मागोवा घेणारा आहे. वन्‍यजीवांना चित्रपटांच्‍या माध्‍यमातून अभिव्‍यक्‍ती देणाऱ्या या कार्याला जागतिक स्‍तरावर पोहोचेल, अशा विश्‍वास मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Wild Tadoba ) यांनी व्‍यक्‍त केला.
 
मुख्‍यमंत्री म्‍हणाले, महाराष्‍ट्रात ( Wild Tadoba ) आता मोठ्या प्रमाणात पर्यटक, संशोधक येत असून सर्व प्रकारची रोजगार निर्मिती होत आहे. वन आणि वन्‍यप्राणी संवर्धन हा मुठभर लोकांचा विषय राहिलेला नसून या क्षेत्रात समाजाचा विश्‍वास प्राप्‍त केला आहे. क्षेत्रीय संशोधन व संवर्धन, जनजागृती व स्‍थानिकांचा सहभाग या तीन गोष्‍टीवर सोसायटी भर देत असून जंगल नष्‍ट होण्‍याची समस्‍या, मानव-वन्‍यप्राणी संघर्ष, दुर्लक्षित झाडांच्‍या प्रजाती, कुरण या क्षेत्रात काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. मागील दहा-पंधरा वर्षात महाराष्‍ट्रातील वनविभागाने वन्‍यजीव क्षेत्रात अतिशय उत्‍तम काम केले असून ‘इकॉलॉजी’सोबत ‘इकॉनॉमी’ निर्माण करण्‍यासाठी विशेष प्रयास केले आहेत.
 
मुंबई येथील मंत्रालयात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त एशियाटिक बिग कॅट सोसायटी आणि वन्यजीव शाखा, वन विभाग, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता. यात वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा पहिला राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर सुब्बिया नल्लामुथु यांना मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते सन्‍मानपूर्वक प्रदान करण्‍यात आला. यात एक लाख रुपये, स्‍मृतिचिन्‍ह, सन्‍मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्‍काराचे स्‍वरूप होते. यावेळी सुब्बिया नल्लामुथु निर्मित ‘वाइल्ड ताडोबा’ या माहितीपटाच्या ट्रेलरचे जागतिक प्रीमियरचे विमोचन देखील मुख्‍यमंत्र्यांच्‍या ( Wild Tadoba ) हस्‍ते करण्‍यात आले.
 
या कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अतिरिक्त मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, एशियाटिक बिग कॅट सोसायटीचे संयोजक अजय पाटील, प्रधान मुख्‍य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) शोमिता बिस्वास, प्रधान मुख्‍य वनसंरक्षक (वन्‍यजीव) म. श्रीनिवास राव, प्रगती पाटील यांची उपस्‍थ‍िती होती. प्रास्ताविक अजय पाटील यांनी केले. संचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी केले तर शुभंकर पाटील यांनी आभार मानले.
 
नवीन धोरण
 
मानव-वन्‍यजीव ( Wild Tadoba ) संघर्षामुळे काही काळ निराशा आली होती. परंतु, त्‍यावर तोडगा काढण्‍यासाठी महाराष्‍ट्र शासन नवीन धोरण आखत असून ग्रामीण भागातील लोकांना संवर्धन कार्याशी जोडण्‍याचा प्रयत्‍न केला आहेत. भविष्‍यात उत्‍तम प्रकारे संवर्धनाचे काम करणे शक्‍य होईल, असाही विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्‍यक्‍त केला. आंतरराष्‍ट्रीय व्‍याघ्र दिनानिमित्‍त मिलिंद म्‍हैसकर व अजय पाटील यांनी मुख्‍यमंत्र्यांना वाघांची प्रतिकृती भेट स्‍वरूपात दिली.