पुणे : ( Fake Delivery Horror ) शिक्षणाचं माहेरघर असलेले पुणे शहर बलात्काराच्या घटनेने हादरले आहे. शहराच्या कोंढवा भागातील एका उच्चभ्रु सोसायटीमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना पुढे येत आहे. डिलिव्हरी बॉयने तोंडावर स्प्रे मारून तिच्या घरात घुसून बलात्कार केल्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोपींने महिलेवर अत्याचार केल्यानंतर तिच्यासोबत सेल्फी काढल्याचीही माहिती समोर आली आहे.
कोंढवा भागातील एका उच्चभ्रु सोसायटीमध्ये बुधवारी रात्री साडे सात वाजताच्या सुमारास डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगून त्याने सोसायटीमध्ये प्रवेश ( Fake Delivery Horror ) केला. त्या सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये आरोपी गेला व पार्सल असल्याचे सांगितले. त्या फ्लॅटमधील तरुणीनी मी कोणतेही पार्सल मागविलेले नाही, असे सांगितले. परंतु, तुम्हाला सही तर करावीच लागेल, असे आरोपी म्हणाल्यामुळे ती तरुणी विचारात पडली. तरुणीने सेफ्टी डोअर उघडले. त्याचवेळी आरोपीने तिच्या तोंडावर स्प्रे मारला आणि त्याने घरात शिरकाव केला. मुलगी बेशुद्ध झाल्याने त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि तिच्या सोबत सेल्फी काढला. आणि पुढे तीला मी परत येईल, असे टाईप करून ठेवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनेची गंभीर दखल घेत तपासासाठी 10 पथके तयार केली आहेत.