India Vs Pakistan : पाकिस्तान भारतात खेळणार ! सुरक्षा यंत्रणांसमोर मोठं आव्हान

04 Jul 2025 12:44:31

ind pak 
दिल्ली : ( India Vs Pakistan ) पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या आशिया कपमध्ये आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या ज्युनियर हॉकी वर्ल्ड कपमध्ये खेळण्यास पाकिस्तान हॉकी संघाला बंदी घालण्यात येणार नाही. असे झाल्यास ऑलिंपिक चार्टरचे हे उल्लंघन ठरेल, असे क्रीडा मंत्रालयाच्या सूत्राने सांगितले. परंतु, जर भारत पाकिस्तान सामना भारतात झाला तर सुरक्षा यंत्रणेवर फार मोठी जबाबदारी असणार आहे. खेळाडूंच्या सुरक्षेच मोठा आव्हान आपल्या समोर असणार आहे. हा सामना केवळ मैदानावरच नव्हे तर राजकीय आणि सामाजिक पातळीवरही महत्वाचा विषय ठरणार आहे.
 
हॉकी आशिया कप 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान बिहारमधील राजगीर येथे होणार आहे, ज्यामध्ये भारतासह आठ संघ सहभागी होतील. ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप 28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान चेन्नई आणि मदुराई येथे खेळला जाईल. आम्ही भारतात बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या कोणत्याही संघाच्या विरोधात नाही. परंतु, द्विपक्षीय स्पर्धा वेगळ्या आहेत असे सूत्राने सांगितले आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. परंतु, ते बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये एकमेकांशी ( India Vs Pakistan ) खेळतात. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कप क्रिकेटमध्ये भारताला पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची परवानगी दिली जाईल का असे विचारले असता, बीसीसीआयने अद्याप या मुद्द्यावर आमच्याशी संपर्क साधलेला नाही. जेव्हा ते संपर्क साधतील तेव्हा आम्ही या विषयावर चर्चा करू.
 
भारत-पाक आमने सामने
 
ऑपरेशन सिंदूर'मुळे आशिया कप हॉकी स्पर्धेत पाकिस्तानच्या सहभागाबद्दल शंका होत्या. मात्र आता पाकचे खेळाडू भारतात येण्याची शक्यता वाढली. भारत आणि पाकिस्तानी संघ मे महिन्यात ओमानमध्ये झालेल्या 10 व्या आशियाई 'बीच हँडबॉल चॅम्पियनशिपमध्ये एकमेकांविरुद्ध खेळले होते. गृह आणि परराष्ट्र मंत्रालयांशी सल्लामसलत केल्यानंतर, क्रीडा मंत्रालयाने परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. आशिया कप व्यतिरिक्त, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मदुराई आणि चेन्नई येथे होणाऱ्या ज्युनियर विश्वचषकात पाकिस्तानच्या सहभागाचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
''आम्ही अद्याप औपचारिक माहितीची वाट पाहत आहोत. परंतु, हॉकीसाठी ही चांगली बातमी आहे. भारत आणि पाकिस्तानचे हॉकी चाहते संघांना एकमेकांविरुद्ध खेळताना पाहू इच्छितात. मात्र, पहलगाम हल्ल्यांमुळे ( India Vs Pakistan ) यात साशंका होती.
 
- दिलीप तिर्की- हॉकी इंडियाचे अध्यक्ष
Powered By Sangraha 9.0