Leopard Attack : थरकापजनक ! बिबट्याचा शिकारी क्षण कॅमेऱ्यात कैद, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ व्हायरल

04 Jul 2025 22:42:47

 Leopard
 
नागपूर : ( Leopard Attack ) गोरेवाड्याच्या घनदाट जंगलाला लागून असलेल्या परिसरात बिबट्याचे दर्शन नेहमीच नागरिकांना होत असते. या भागात आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाव्यतिरिक्तही बिबट्यांचा वावर असल्याचे पुरावे बऱ्याचदा नोंदवले गेले आहेत. गोरेवाडा जलशुद्धीकरण केंद्राच्या किंवा गोरेवाडा जुनी वस्तीच्या संरक्षक भिंतीवर बिबट बसलेला अनेकांनी पाहिला आहे. शुक्रवारी अशाच एका घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात या पूर्वीही बिबट्याने अनेकदा दर्शन दिले आहे. साधारण दोन वर्षांपूर्वी या भागात राहणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरात बिबट्याने धुमाकूळ घातला ( Leopard Attack ) होता.
 
या बिबट्याने केलेली शिकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. बांबू केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या कुत्र्यावर मागून अलगद येऊन बिबट हल्ला करताना दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही घटना मंगळवारी, सायंकाळी 7.30 वाजता घडल्याची माहिती मिळत आहे. तर, या पूर्वीही गेल्या जुलै महिन्यात दाभा परिसरातील संपत ले-आऊट येथील नागरिक रात्री दहाच्या सुमारास शतपावली करण्यासाठी बाहेर पडले होते, तेव्हा बिबट्याने त्यांना दर्शन दिले. हे दृश्य पाहून प्रत्येकाचीच घाबरगुंडी उडाली होती, प्रत्येकजण सैरभैर धावत सुटला होता. अवघ्या काही मिनिटांत घरात शिरून प्रत्येकाने घराची दारे-खिडक्या बंद केल्या, आणि स्वतःला सुरक्षित केले. दुसऱ्या दिवशी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, बिबट्याने रात्री 12 वाजेपर्यंत वेलकम सोसायटी, वूडलँड सोसायटी या भागात 'फेरफटका' मारल्याचे दिसून ( Leopard Attack ) आले.
 
बिबट्या सीसीटीव्हीत कैद
 
गेल्या वर्षी गोधनी परिसरात बिबट आढळल्यानंतर येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. येथील रहिवाशाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने बिबट्याची हालचाल कैद केली. हे दृश्य पाहून नागरिकांची घाबरगुंडी उडाली होती. येथील सावंत सोसायटीतील एका तरुणाने रात्री दहा वाजताच्या सुमारास बिबट्याला पाहिल्याचा दावा केला आहे. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी बिबट्याचा शोध घेतला, पण तो सापडला ( Leopard Attack ) नाही.
 
शिकारीसाठी बिबट्या बाहेर
 
29 ऑगस्ट 2022 रोजी कोराडी विद्युत निर्मिती केंद्राच्या जुन्या राख धरणाला लागून असलेल्या हिरव्यागार झाडीत बिबट घुटमळत असल्याचे पाहून सुरक्षा रक्षक चांगलेच घाबरले. त्यांनी तात्काळ महानिर्मितीच्या वरिष्ठ सुरक्षा व्यवस्थापकांना माहिती दिली. गावातील कुत्रे आणि डुक्कर खाण्यासाठी हा बिबट येत असावा, अशी शक्यता केंद्राच्या आजूबाजूच्या रहिवाशांनी दर्शविली आहे. तर 20 ऑक्टोबर 2022 रोजी केंद्रात मादी बिबट्याने दर्शन दिले होते. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरे लावून मादीला जेरबंद केले.
Powered By Sangraha 9.0