BJP Leadership Race : सत्तेच्या शिखराकडे वाटचाल ? सीतारमण यांचं नाव रेसमध्ये झपाट्यानं पुढे

05 Jul 2025 14:00:42

sita
 
दिल्ली : ( BJP Leadership Race ) राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीबाबत भाजपात हालचाली चांगलाच वेग आला आहे. गेल्याच आठवड्यात अनेक राज्यांमध्ये प्रदेश अध्यक्षांच्या निवडणुकाही पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यासाठी राज्यांचा कोरमही पूर्ण झाला. या पदासाठी पक्षाच्या मुख्यालयाच्या कॉरिडॉरमध्ये भाजपाच्या तरुण चेहऱ्यांसह अनेक अनुभवी ज्येष्ठांची नेत्यांची बरीच नावे सातत्याने पुढे मागे होत आहेत. दरम्यान, शुक्रवारपासून दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकही सुरू झाली. या बैठकीतच संघ आणि भाजपाचे सर्वोच्च नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्षावर शिक्कामोर्तब करेल, असे मानले जात आहे.
 
भाजपातील सूत्रांनुसार, संघाच्या हेतूला साजेसे असे नाव पक्ष नेतृत्व ठरवू शकलेले नाही. संघाच्या उद्देशानुसार भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाकडे राजकीय विस्तारापेक्षा संघटना विस्ताराची विचारसरणी असावी. संघाच्या या हेतूला आत्मसात करण्यात भाजपाचे उच्च नेतृत्व प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे पक्षात पहिल्या महिला राष्ट्रीय अध्यक्षाच्या नावाचाही गंभीर विचार सुरू झाला आहे. सध्या महिला अध्यक्षपदाच्या दावेदारांमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण, डी. पुरंदेश्वरी, वनती श्रीनिवासन, विजया रहाटकर यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी पुरंदेश्वरी यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या नावाच्या चर्चेचे वजन जास्त असल्याची माहिती सूत्रांकडून ( BJP Leadership Race ) मिळते आहे.
 
लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत न मिळाल्याने आणि केवळ 240 जागांवर आल्यामुळे संघ भाजपावर दबाव टाकत आहे. त्यातल्या त्यात ऑपरेशन सिंदूरनंतर संघाचा हा दबाव अधिकच वाढला असल्याचे म्हटले जात आहे. ज्या प्रमाणे अलिकडेच संघाच्या पार्श्वभूमीवर नियुक्त झालेले सुमारे डझनभर राज्याचे प्रदेशाध्यक्ष संघाच्या पार्श्वभूमीतून आले आहेत, तसेच संघाला संघटनेवर पूर्ण नियंत्रण हवे आहे. संघाची इच्छा आहे की भाजपाचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष संघाला पूर्णपणे समर्पित असलेला असावा. यामुळे सुद्धा भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची नियुक्ती होत नसल्याचेही मानले जात आहे. परंतु तज्ज्ञांचे मते पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा दबावाखाली येणार नाहीत. ते शेवटच्या क्षणी अशा व्यक्तीचे नाव पुढे करू शकतात, ज्यावर संघही कोणतीही प्रतिक्रिया ( BJP Leadership Race ) देऊ शकणार नाही.
 
महिला आरक्षण लागू करण्याची घोषणा करणाऱ्या भाजपाला पहिल्या महिला अध्यक्षा मिळविण्यात संघाकडून कोणताही अडथळा आला तर त्याचे परिणाम सांगून भाजपा नेतृत्व संघाला राजी करण्याचा प्रयत्न करू शकते. संघाच्या नियंत्रण मोहिमेला किंवा योजनेला तोंड देण्यासाठी भाजपा नेतृत्वाने उचललेले हे एक मोठे पाऊल असू शकते असे म्हटले जात आहे. भाजपाच्या हायकमांडला याची माहिती आहे की पुरुष नावाच्या नियुक्तीला व्हेटो केला जाईल. परंतु महिलेचे नाव पुढे आले तर संघाला व्हेटो करणे कठीण होऊ शकते. जर महिला नावाला विरोध केला तर भाजपा नेतृत्वाऐवजी संघावर हल्ले केले जातील. याद्वारे, भाजपा नेतृत्व सरकार आणि संघटनेवर आपले नियंत्रण राखण्यात यशस्वी होऊ शकते. भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की एखाद्या राज्यातील समर्पित कार्यकर्त्याला नवीन अध्यक्ष बनवण्यावर एकमत होण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी भाजपाच्या ( BJP Leadership Race ) पुढील राष्ट्रीय अध्यक्षाची नियुक्ती करण्याची चर्चा वेग धरते आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0