Sword Of Legacy : नागपूरला मिळतोय शौर्याचा वारसा ! महाराष्ट्रात परततेय 'ती' ऐतिहासिक तलवार

08 Jul 2025 15:00:11
 
 
sword 1
 
नागपूर : ( Sword Of Legacy ) नागपूरच्या भोसले घराण्यातील शूर मराठा सरदार राजे रघुजी भोसले यांची तलवार आपल्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण वारसा असून, मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी आहे. आपण महाराष्ट्र सरकारची मालमत्ता मानून, ती परत आणण्यासाठी प्रयत्न केल्याचे शेलार म्हणाले. लंडनमधील 'सोथेबीज' या लिलाव संस्थेने 29 एप्रिल 2025 रोजी या तलवारीचा लिलाव केला. तलवारीवर रघुजी भोसले यांचे नाव कोरलेले असून, तिची मूठ सोन्याची आहे. युद्धात वापरलेली ही तलवार कदाचित त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून देशातून बाहेर गेली ( Sword Of Legacy ) असावी.
 
शूर मराठा सरदार रघुजी राजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा 15 ऑगस्टपूर्वी लंडनहून महाराष्ट्रात परत आणली जाईल, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधान परिषदेत दिली. लंडनमध्ये या तलवारीचा लिलाव झाल्यावर, महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी मिळवण्यासाठी आणि कार्यालयीन व्यवस्था उभारण्यासाठी त्वरित पाऊले उचलली. या व्यवस्थेमध्ये प्रवीण चल्ला यांच्या माध्यमातून राज्य सरकारने बोली लावली. सुमारे 69 लाख 94 हजार 437 रुपये (करासहित) खर्च करून ही तलवार ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यासाठीच्या खर्चास 21 मे 2025 रोजी शासनाने मान्यता दिल्याचे शेलार ( Sword Of Legacy ) यांनी सांगितले.
 
आता कस्टम क्लीअरन्स, पॅकिंग, हाताळणी या सर्व बाबींसाठी स्टार वर्ल्ड वाईड ग्रुप प्रा. लि. या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. 15 ऑगस्टपूर्वी, म्हणजेच जुलै महिन्यातच, आपल्या मराठ्यांच्या, मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या पराक्रमाची साक्ष असलेली ही तलवार आपण सन्मानपूर्वक महाराष्ट्राच्या भूमीत परत आणू आणि ती सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करू, असे शेलार ( Sword Of Legacy ) म्हणाले.
 
घराण्याला वारसा नागपुरात यावा
 
तलवार महाराष्ट्रात येत आहे, ही अभिमानाची बाब आहे. लिलाव झालेल्या दिवसापासून आम्ही त्या तलवारीची प्रतीक्षा करत आहोत. ही तलवार नागपूरच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देते. हा वारसा नागपुरात यावा आणि शासकीय संग्रहालयात उपलब्ध असावा, अशी आमची अपेक्षा आहे. इतकेच नव्हे तर हा वारसा आमच्या घराण्याला मिळावा, अशी विनंती आम्ही राज्य सरकारकडे केली आहे. त्यासाठी शासनाला झालेला खर्च परत देण्यासही आम्ही तयार आहोत.
- राजे मुधोजी भोसले, संस्थापक अध्यक्ष, महाराज ऑफ नागपूर ट्रस्ट
Powered By Sangraha 9.0