_202507092217561892_H@@IGHT_500_W@@IDTH_950.png)
मुंबई : ( Political Portrayal Controversy ) विधान परिषदेच्या अधिवेशनादरम्यान आमदार डॉ. परिणय फुके यांनी एक अत्यंत महत्त्वाचा आणि समाजमनावर दूरगामी परिणाम करणारा मुद्दा सभागृहात मांडला. त्यांनी चित्रपट, नाटक, वेब सिरीज आणि विविध दृकश्राव्य माध्यमांमधून राजकीय नेत्यांचे जसे की आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक यांचे वारंवार नकारात्मक, आक्षेपार्ह आणि अपमानकारक स्वरूपात होणारे चित्रण यावर जोरदार आवाज उठवला. तर अशा पद्धतीच्या चित्रणावर निर्बंध घालण्यात यावे, अशी मागणी केली.
डॉ. फुके यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, या माध्यमांतून नेत्यांना अनेकदा गुंड, माफिया, भ्रष्टाचारी किंवा टोळी प्रमुख अशा स्वरूपात रंगवले जाते. हे चित्रण मनोरंजनापुरते मर्यादित राहत नाही, तर समाजाच्या मानसिकतेवर खोलवर परिणाम करते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या मनात राजकीय नेतृत्वाविषयी एक नकारात्मक भावना निर्माण होते. परिणामी, खऱ्या अर्थाने जनतेसाठी झटणाऱ्या आणि विधायक कार्य करणाऱ्या नेत्यांनाही अविश्वास आणि बदनामीचा सामना ( Political Portrayal Controversy ) करावा लागतो.
या पार्श्वभूमीवर फुके यांनी सरकारकडे काही ठोस मागण्या मांडल्या. त्यांनी सांगितले की, राजकीय नेत्यांचे चित्रण दृकश्राव्य माध्यमांमध्ये कसे केले जाते, याचा अभ्यास करण्यासाठी एक स्वतंत्र समिती नेमावी. तसेच, जर एखाद्या माध्यमातून लोकप्रतिनिधींचे आक्षेपार्ह चित्रण केले जात असेल, तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक नियामक यंत्रणा स्थापन करणे आवश्यक आहे. यासोबतच, राजकारणातील सकारात्मक बाजू – जसे की नेत्यांचे जनहितासाठीचे योगदान, सामाजिक कामे आणि जनतेसोबतचा संपर्क, याची जनजागृती करणारे अभियान सरकारने ( Political Portrayal Controversy ) हाती घ्यावे, अशीही त्यांची मागणी होती.
या मुद्द्यावर सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी तत्काळ प्रतिसाद दिला. त्यांनी फुके यांच्या मांडणीची दखल घेत ती अत्यंत योग्य आणि समयोचित असल्याचे मान्य केले. शेलार यांनी सांगितले की, “या बाबीचा शासन गांभीर्याने विचार करेल. संबंधित विभागांशी चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. लवकरच अभ्यास समिती स्थापन करून माध्यमातील नेत्यांच्या चित्रणाचे विश्लेषण करण्यात येईल आणि आवश्यक त्या सुधारणा व नियमनासाठी धोरण आखले ( Political Portrayal Controversy ) जाईल.”
या चर्चेने संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. इतर सदस्यांनीही फुके यांच्या मांडणीचे समर्थन करत दृकश्राव्य माध्यमांनी अधिक जबाबदारीने वागण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडले. लोकशाही प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणाऱ्या लोकप्रतिनिधींविषयी जनतेमध्ये आदर निर्माण होणे आवश्यक असून, त्यांच्या प्रतिमेला नुकसान पोहोचवणारी कोणतीही कृती समाजासाठी घातक ठरू शकते, हे या चर्चेतून अधोरेखित झाले. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सरकार लवकरच उपाययोजना करणार असल्याचे स्पष्ट झाले असून, जनतेच्या मनात लोकप्रतिनिधींची वस्तुनिष्ठ आणि सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.