कधी कधी (Rahu Shani Impact )आपल्याला अशा गोष्टी किंवा घटनांचा अंदाज येतो ज्या घटना भविष्यात घडत असतात. आपण कुणाच्या घरी जाता पण तेथे 5 मिनिटापेक्षा जास्त काळ आपण राहू शकत नाही. तुमचा जीव घाबरल्यासारखा होत अस्वस्थता जाणवते, पण हा दोष तुमचा नसून घरात येणाऱ्या किरणांचा असतो. कधी तर घरात बसल्या बसल्या वादविवाद निर्माण होतात. मुले मोठ्यांचे अपमान करतात, लहान-सहान गोष्टीसुद्धा मोठमोठाले ताणतणाव निर्माण (Rahu Shani Impact ) करतात. अशा घरात शनी व राहूच्या नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कार्य करीत असतो.
अशावेळी काय करायला पाहिजे ?
- घरातील वातावरणाला सौहार्दपूर्ण ठेवावे.
- घरात नेहमी सुवासांचा (चंदन, कापूर) वापर करावा.
- घराच्या आत व बाहेर तुळशी व सीझनल फुलांचे रोप लावावे
- सकाळ व सायंकाळी पूजा आरती करावी.
- घरात लोखंडांच्या फर्निचरचा वापर कमीत कमी करावा
- अभ्यास करताना पाण्याची वाटी समोर ठेवून बसावे
- मोहरी-लवंग-राजमा व उडदाच्या डाळीचे सेवन कमी करावे.
- रबराचा वापर कमी करावा.
- महिन्यातून एक किंवा दोनदा उपास करून दान करावे
- माशांची सेवा करावी.