Vision Revived : अंधाराच्या दारात उभ्या ‘दीपका’ला मेडिकलचा आधार ! उपचारांनी उजळले जीवन

13 Aug 2025 23:22:00

Vision Revived
 
नागपूर : ( Vision Revived ) यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील दीपकच्या आयुष्यातील संकटे लहानपणापासून सुरू झाली. आई-वडिलांना डोळ्यांचा गंभीर आजार होता. आई गेल्यानंतर काही महिन्यांत वडीलही वारले. आत्याने दीपक व दोन बहिणींना आश्रमात दाखल केले. मात्र काही वर्षांनी दीपक मुंबईला निघून गेला आणि कापडाच्या दुकानात काम करू लागला. वडिलांप्रमाणेच त्यालाही डोळ्यांचा आजार झाला आणि अंधत्व आले. नोकरी गेल्यानंतर बहिणींनी मदतीस नकार दिला.
 
लहानपणापासूनच संकटांचा सामना करत आलेल्या 33 वर्षीय दीपक खंडोजी कानडे याच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले. पाचव्या वर्षी आई-वडिलांचे छत्र हरवले, बहिणींनी आधार सोडला आणि डोळ्यांचा प्रकाश कायमचा हरपला. तरीही, सध्या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) डॉक्टर, परिचारिका आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याचे पालकत्व स्वीकारून उपचारासह जगण्याचे बळ ( Vision Revived ) दिले.
 
जगण्यासाठी दीपक दोन वर्षे रेल्वे गाड्यांमध्ये भिक्षा मागू लागला. सहा महिन्यांपूर्वी रेल्वेतून पडून त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले. त्यानंतर पुन्हा पडून पाय व हाताला दुखापत झाली. उपचारासाठी तो अकोला स्टेशनवरून मेडिकलमध्ये दाखल करण्यात आला. उपचार पूर्ण झाले असले तरी अंधत्वामुळे त्याचे पुनर्वसन कठीण आहे. कोणतेही अनाथालय त्याला स्वीकारण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत मेडिकलचे वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक नरेश नासरे आणि त्यांचे पथक त्याच्या पुनर्वसनासाठी प्रयत्नशील आहेत. वॉर्ड क्रमांक 14 मधील डॉक्टर, परिचारिका आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दीपकचे पालकत्व स्वीकारून त्याला मदत करण्याचा ( Vision Revived ) संकल्प केला आहे.
Powered By Sangraha 9.0