नागपूर : ( Sweet Killer Diabetes ) भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद-भारत मधुमेह (आयसीएमआर -इंडीएबी) च्या 2023 च्या अहवालानुसार, भारतात वीस वर्षांपेक्षा कमी वयाच्या 2.5 लाखांहून अधिक मुले आणि तरुण टाईप-1 मधुमेहाने ग्रस्त आहेत. त्याहूनही अधिक चिंताजनक बाब म्हणजे दरवर्षी या यादीत 15 ते 18 हजार नवीन बालरुग्ण जोडले जात आहेत. दुसरीकडे, टाईप-2 मधुमेह असलेल्या बालरुग्णांची संख्याही वाढत आहे.
मधुमेह ( Sweet Killer Diabetes ) हा आजार एकेकाळी केवळ प्रौढांमध्ये आढळून येत होता. परंतु ,आता त्याहुनही एक गंभीर स्वरुपाचे चित्र दिसून येत आहे. चिमुकल्यांसह तरुणांमध्येही आता मधुमेहाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते टाईप-1 मधुमेह इन्सुलिनचे उत्पादन पूर्णपणे थांबल्यामुळे होतो. हा प्रकार प्रामुख्याने 1 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये दिसून येतो. या वयोगटातील मुलांना दररोज इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागते आणि त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियमित तपासणी करावी लागते. लठ्ठपणा, कमी शारीरिक हालचाल आणि अस्वास्थ्यकर आहार यामुळे किशोरवयीन मुलांमध्येही टाईप-2 मधुमेहाची प्रकरणे चिंताजनक दराने वाढत आहेत.
'जर्नल ऑफ पीडियाट्रिक एंडोक्राइनोलॉजी अँड मेटाबॉलिझम' (2022) मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यास नुसार, मुंबई, दिल्ली, पुणे आणि चेन्नई सारख्या शहरी भागात गेल्या 10 वर्षांत टाईप-2 मधुमेहाची प्रकरणे जवळजवळ दुप्पट झाली आहेत. बालरोग तज्ञांच्या मते, शहरातही लहान मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्ये हा आजार वाढत आहे. जंक फूड, मैदानी खेळाचा अभाव, मोबाईलचा अतीवापर ही सुद्धा मुलांमध्ये मधुमेह ( Sweet Killer Diabetes ) वाढण्याची कारण असल्याचे डॉक्टर सांगतात.
राष्ट्रीय आरोग्य मिशन (एनएचएम) 2024 च्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 18 वर्षांखालील 14,000 हून अधिक मुलांना मधुमेह ( Sweet Killer Diabetes ) व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत नोंदणीकृत केले आहे. आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की उशिरा निदान, अपुरी तपासणी सुविधा आणि जागरूकता नसल्यामुळे ग्रामीण भागातील मुलांमध्ये डोळ्यांचे आजार आणि इतर गुंतागुंत अधिक सामान्य आहेत.
इंडियन ॲकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स अँड डायबिटीजनुसार, जर मुलांमध्ये मधुमेहाची ( Sweet Killer Diabetes ) प्रकरणे नियंत्रित करायची असतील, तर शाळांमध्ये नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहाराबद्दल मार्गदर्शन आणि मुलांमध्ये खेळ आणि व्यायाम यांना प्रोत्साहन देणे यांसारखी आवश्यक पावले उचलणे महत्त्वाचे आहे. मधुमेह ही केवळ साखरेची पातळी वाढण्याची समस्या नाही, तर हा एक गंभीर आजार ( Sweet Killer Diabetes ) आहे ज्याचे आयुष्यभर व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
पूर्वी मुलांमध्ये केवळ टाईप-1 मधुमेह दिसून येत होता, पण आता टाईप-2 चे प्रमाण देखील वाढत आहे. मुलांनी मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे. कोणताही शारीरिक व्यायाम, तो अनिवार्य आहे. जंक फूडची सवय ही धोकादायक आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची आहे.
डॉ. पूजा जाधव, एंडोक्राइनोलॉजिस्ट, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
जंक फूड, सॉफ्ट ड्रिंक आदींचे सेवन शरीरासाठी हानिकारक आहे. लहान मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी मैदानी खेळ आवश्यक आहेत. शाळेत किंवा घरी आल्यानंतर कमीत कमी अर्धा ते एक तास शारीरिक व्यायाम करणे आवश्यक आहे. मधुमेह झाल्यावर त्याचे दीर्घकाळ योग्य व्यवस्थापन करावे लागते. पालकांनीच मुलांच्या आरोग्यावर ( Sweet Killer Diabetes ) लक्ष दिले पाहिजे.
डॉ. मनीष तिवारी, एचओडी, बालरोग विभाग, मेडिकल
दैनंदिन जीवनशैलीतील बदल मधुमेहासाठी कारणीभूत ठरत आहे. पूर्वी बहुतेकदा टाईप-1 मधुमेह ( Sweet Killer Diabetes ) आढळत होता, पण आता टाईप-2 देखील वाढत आहे. निरोगी समाजासाठी लहान मुले आणि किशोरवयीन मुलांचे सुदृढ राहणे आवश्यक आहे मोबाईलचा अती वापरामुळे लठ्ठपणाला आमंत्रण दिले जाते.
- डॉ. अनिल राऊत, बालरोग तज्ञ