Ganesh Festival 2025 : मराठी कलाविश्वातही दुमदुमला गणपती बाप्पा मोरया

27 Aug 2025 20:19:06
 
Ganesh Festival
 
बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रात बाप्पाचं आगमन ( Ganesh Festival 2025 ) झालेले आहे. संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने दुमदुमून निघालाय. दरम्यान मराठी कलाकारांच्या घरी बाप्पांचं आगमन झालय. अनेक सेलिब्रिटींच्या घरी बाप्पांचं आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आलं. यावेळी प्रत्येक कलाकरांच्या घरात बाप्पांच्या जयघोषाचा एकच नाद दुमदुमला.
 
सुबोध भावे : सुबोध भावेच्या घरी गणपतीचं आगमन झालं आहे. अभिनेत्यानं कुटुंबियासह विधिवत पूजा करून बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली गेली. सुबोध भावे आणि त्यांच्या मुलांनी बाप्पासाठी एक छोटा देखावा देखील तयार केला आहे.
 
विवेक सांगळे : अभिनेता विवेक सांगळेच्या घरी बाप्पाचं स्वागत हे जल्लोषात करण्यात आलं आहे. अभिनेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो बाप्पाला घेऊन आपल्या घरी घेऊन जाताना दिसत आहे. त्याचा आता हा व्हिडिओ अनेकांना आवडत ( Ganesh Festival 2025 ) आहे.
 
स्वप्नील जोशी : अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी बाप्पाचं आगमन ( Ganesh Festival 2025 ) करण्यात आलंय. आता सोशल मीडियावर स्वप्नील जोशीनं एक व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये तो घराच्या बाहेर आहे आणि त्याच्या हातात बाप्पा आहे. याशिवाय त्याच्या कुटुंबातील सदस्य गणेशाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करताना दिसत आहेत. तसेच आणखी एका व्हिडिओमध्ये अभिनेता लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना करताना दिसत आहे.
 
सोनाली कुलकर्णी : मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं स्वत: बाप्पाची मूर्ती घडवली आहे. तिनं काही तासापूर्वी आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती आपल्या भावाबरोबर असल्याची दिसत आहे. ती आणि तिचा भाऊ स्वत: बाप्पाची मूर्ती खूप सुंदर पद्धतीनं तयार करत आहे. आता अभिनेत्रीच्या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
 
रुपाली भोसले : रुपाली भोसलेनं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही सुंदर व्हिडिओ शेअर ( Ganesh Festival 2025 ) केले आहेत. यामध्ये ती बाप्पाला कारमधून घरी नेत असल्याची दिसत आहे. रुपालीनं आपल्या घरी बाप्पासाठी जबरदस्त सजावट केली आहे. आता तिनं शेअर केले व्हिडिओ अनेकांना आवडत आहे. दरम्यान मराठी कलाकारांच्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
 
सायली संजीव : मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवच्या नाशिकमधील घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना ( Ganesh Festival 2025 ) केली आहे. विशेष म्हणजे अगदी सुरुवातीपासून सायली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करते. यंदाही तिने अतिशय साध्या पद्धतीने श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. विशेष म्हणजे स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी सायली स्वतः आपल्या हाताने घरात श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करते.
 
अभिज्ञा भावे : अभिनेत्री अभिज्ञा भावे ही दरवर्षी गणपती बाप्पाचे मोठ्या जल्लोषात स्वागत ( Ganesh Festival 2025 ) करते. तिने यंदा देखील अतिशय सुंदर असे डेकोरेशन करत बाप्पाचे स्वागत केले आहे.
 
अमृता खानविलकर : महाराष्ट्राची चंद्रा अमृता खानविलकरच्या घरचा छोटा गणोबा पाहा. डोळ्यांचे पारणे फेडणारी गणपतीची मूर्ती आहे.
 
अंकिता वालावलकर : 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरच्या घरी सुंदर गणरायाचे आगमन ( Ganesh Festival 2025 ) झाले आहे. तिच्या सासरी आणि माहेरी दोन्ही ठिकाणी गणपती येतो.
 
मिलिंद गवळी : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेते मिलिंद गवळी यांनी बाप्पाचे घरी स्वागत केले आहे. बाप्पाची सुरेख मूर्ती पाहा.
Powered By Sangraha 9.0