नागपूर : ( AI Scam Expose ) बनावट कागदपत्रांच्या आधारावर बँकांतून कर्ज घेत तीन कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला वाठोडा पोलिसांनी मदत केली आहे. पोलिसांनी आरोपींना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) च्या मदतीने अटक केली. धनंजय यांचे नातेवाईक नीरत सोईतकर यांना खरबीच्या अंबेनगरातील त्यांचा फ्लॅट विकायचा होता. त्याबाबत त्यांनी ओएलएक्सवर जाहिरात टाकली होती आणि संपर्कासाठी धनंजय यांचा नंबर दिला होता. आरोपी नीलेश पौनिकर आणि संदीप निंभोरकर यांनी त्यांच्याशी संपर्क केला. फ्लॅट खरेदी करण्याची तयार दर्शवित त्यांना कागदपत्रांची झेरॉक्स प्रत मागितली. या प्रतींच्या आधारावर दोन्ही आरोपींनी इमरान अलीच्या माध्यमातून बनावट कागदपत्र तयार केले. सोईतकर यांच्या जागी अजय पाठराबेचा फोटो लावण्यात आला. आरोपी पाठराबे याने अपंग असल्याचे बनावट कागदपत्र बनवले. आरोपींनी सोईतकर यांच्या नावाने नागपूर नागरिक सहकारी बँकेत बनावट खाते उघडले. त्यानंतर फ्लॅट खरेदी करण्यासाठी डीसीबी बँकेतून कर्ज घेण्यात आले. कर्जाची रक्कम बनावट खात्यात जमा झाल्यानंतर आरोपींनी ( AI Scam Expose ) ती आपसात वाटून घेतली.
आरोपींनी अशाप्रकारे पूर्वीही फसवणूक केली होती, मात्र मुख्य आरोपी नीलेश पौनिकर पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्याने काही प्रकरणात जामीन घेतला होता आणि काहींमध्ये फरार होता. त्यामुळे त्याला अटक करण्यासाठी तपास अधिकाऱ्याने एक योजना तयार केली. पौनिकरच्या फेसबुक अकाउंटवर पोलिसांना त्याच्या मुलाचा शाळेचा गणवेशात फोटो दिसला. चॅट जीपीटीच्या माध्यमातून शाळेचा शोध घेण्यात आला. पोलिसांना विश्वास होता की, तो मुलाला घेण्यासाठी शाळेत जाईल. शाळेच्या आसपास सापळा रचून त्याला अटक ( AI Scam Expose ) करण्यात आली.
आता सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांनी आणखी कोणा-कोणाची फसवणूक केली याचा शोध घेतला जात आहे. आरोपींनी अशाप्रकारे ११ मालमत्तांचे कागदपत्र तयार करून वेगवेगळ्या बँकांना ३ कोटींचा चुना लावला आहे. त्यांच्याविरुद्ध बेलतरोडी, सदर, पाचपावली, सक्करदरा आणि वाठोडा ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. ही कारवाई वपोनि हरीशकुमार बोराडे, पोउपनि अमोल पाटील, सचिन ठाकरे, प्रणाली बेनके, कैलाश श्रावणकर, हिमांशू पाटील आणि रोहित मटाले यांनी केली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ५ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तपासात आरोपींनी आतापर्यंत ११ मालमत्ता प्रकरणात फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. काही प्रकरणात आरोपींना जामीन मिळाला होता, तर काही प्रकरणात ( AI Scam Expose ) ते फरार होते.
याबाबत सविस्तर माहिती देताना झोन ४ च्या पोलिस उपायुक्त रश्मिता राव यांनी सांगितले की, आरोपी दुसऱ्याच्या मालमत्तांचे बनावट कागदपत्र तयार करून मुळ मालकाऐवजी दुसऱ्या व्यक्तीला उभे करीत रजिस्ट्री करून घेत होते. इतकेच नाहीतर मालमत्ता खरेदी करण्यासाठी बँकांतून कर्जही घ्यायचे आणि कर्जाची सर्व रक्कम आपसात वाटून घेत होते. नीलेश मनोहर पौनिकर (३१) रा. न्यू डायमंडनगर, संदीप चांदराव निंभोरकर (३६) रा. विनायकनगर, इशान बळीराम वाटकर (३७) रा. पंतप्रधान आवास क्वॉर्टर, वाठोडा, इमरान अली अख्तर अली हाशमी (४६) रा. नागार्जुन कॉलनी, आर्यनगर आणि अजय वामन पाठराबे (४१) रा. रेशम ओळ, भारत माता चौक अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. वाठोडा पोलिसांनी गत १९ ऑगस्ट रोजी धनंजय जैन (३९) रा. चैतन्यश्वरनगरच्या तक्रारीवरून ( AI Scam Expose ) आरेापींविरुद्ध गुन्हा नोंदविला होता.