Share Market Trap : सायबर ठकबाजांचे नवे हत्यार ! शेअर बाजाराच्या आमिषाने तरुणीला २४ लाखांचा फटका

01 Sep 2025 18:47:56

Share Market Trap
 
नागपूर : ( Share Market Trap ) सायबर ठकबाजांनी एका तरुणीला तब्बल २४ लाखांनी लुटले. शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक करून गुन्हेगारांनी मोठा डाव रचला आहे. पीडित तरुणी ही उच्च शिक्षित असून आई-वडिलांसह घरीच राहते. तिला तांत्रिक ज्ञान आहे आणि ती शेअर्समध्ये पैसेही गुंतविते. २३ जून रोजी तिच्या व्हॉट्सअॅपवर एक मॅसेज आला. त्यात लाँग टर्म आणि इंट्राट्रेड स्टॉकच्या आवश्यकतेबाबत विचारणा करण्यात आली होती. पीडितेने माहिती दिली की, तिने काही स्टॉक आधीच खरेदी केले आहेत आणि आता तिला लाँग टर्म स्टॉकमध्ये पैसे गुंतवायचे ( Share Market Trap ) आहेत. आरोपींनी तिला एक लिंक पाठवून 'सी २१ पैसा कॅपिटल लिमिटेड' नावाच्या ग्रुपशी जोडले. या ग्रुपमध्ये खरेदी-विक्रीची संपूर्ण माहिती दिली जात होती. त्यानंतर आरोही आणि राठीने वेगवेगळ्या नंबरवरून तिच्याशी चर्चा केली. त्यांच्या माध्यमातून पैसे गुंतविल्यास अधिक नफा होण्याची माहिती दिली आणि त्यांची कंपनी अनेक वर्षांपासून हे काम करीत असल्याची माहिती दिली.
 
पीडितेचा त्यावर विश्वास बसला आणि अधिक नफा कमविण्याच्या नादात तिने आरोपींनी सांगितलेले एक अॅप्लिकेशन डाऊनलोड केले. त्यांच्या जाळ्यात अडकून पीडिता तिच्या आई-वडिलांच्या खात्यातून आरोपींनी दिलेल्या खात्यांमध्ये पैसे वळते करीत गेली. तिला तिच्या खात्यामध्ये १.६५ कोटी रुपये जमा झाल्याचे दिसत होते. मात्र जेव्हा तिने ते पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा तांत्रिक अडचण आली. पीडितेने आरोही आणि आनंद यांच्याशी संपर्क केला. आरोपींनी कमिशन जमा केल्यानंतरच पैसे काढता येतील, अशी माहिती दिली. पीडित आणखीनच जाळ्यात ओढली गेली. त्यानंतर आरोपींनी पीडितेशी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे पीडितेच्या लक्षात आले. तिने सायबर पोलिसात तक्रार दाखल ( Share Market Trap ) केली. पोलिसांनी आयटी अॅक्टसह फसवणुकीच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
 
तिच्याकडून तब्बल २४ लाख रुपये गुंतवून घेतले, मात्र परतावा एक रुपयाचाही मिळाला नाही. विशेष म्हणजे तरुणीच्या खात्यात लाखोंचा नफा दिसत होता. मात्र जेव्हा तिने पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी सायबर पोलिसांनी २५ वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून आरोही सिन्हा आणि आनंद राठीसह विविध खातेधारकांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
Powered By Sangraha 9.0