High Court Verdict : हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल ! शिक्षित महिलांचे विवाहित पुरुषाशी संबंध आता शोषण मानले जाणार नाहीत

11 Sep 2025 17:59:53

High Court Verdict
 
दिल्ली - ( High Court Verdict ) दिल्ली हायकोर्टाने एक महत्वपूर्ण मुद्दा स्पष्ट केला आहे. या ऐतिहासिक निकालाने पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाला न्याय मिळणार आहे. जेव्हा एखादी सुशिक्षित आणि स्वतंत्र महिला तिच्या जोडीदाराच्या विवाहित स्थितीची माहिती असूनही त्याच्याशी प्रेमसंबंधात राहते, तेव्हा तिला कायद्याने दिशाभूल केलेली किंवा शोषित म्हटले जाऊ शकत नाही, अशी टिप्पणी दिल्ली हायकोर्टाने केली.
 
हा मुद्दा न्यायालायने एका पुरुषाविरुद्ध बलात्काराचा खटला फेटाळतांना दिला. न्यायमूर्ती स्वर्णकांत शर्मा म्हणाले, जर दोन प्रौढांमधील संमतीने झालेला संबंध नंतर तुटला तर तो बलात्काराचा गुन्हा ठरू शकत नाही. हे न्यायाच्या संवैधानिक भावनेच्या आणि लैंगिक गुन्हे कायद्याच्या उद्देशाच्या विरुद्ध असेल. न्यायमूर्ती शर्मा म्हणाले, हे स्पष्ट आहे की दोघांमधील संबंध लग्नाच्या खोट्या आश्वासनामुळे नव्हते तर संमतीने होते. त्यामुळे लैंगिक छळ आणि फसवणुकीचा अर्ज फेटाळण्यात ( High Court Verdict ) येत आहे.
Powered By Sangraha 9.0