Kid Of The Year : लहानग्या तेजस्वीने सायबर गुन्ह्यांना दिली मात ! ठरली ‘किड ऑफ द ईयर’

12 Sep 2025 17:07:01
 
kids
 
दिल्ली : ( Kid Of The Year ) भारतीय वंशाची १६ वर्षीय तेजस्वी मनोज तिच्या आजोबांना ईमेलद्वारे 2000 डॉलर्सची फसवणूक होण्यापासून वाचवल्यानंतर तिने “शील्ड सीनियर्स” हे प्लॅटफॉर्म तयार केले. हे प्लॅटफॉर्म वरिष्ठ नागरिकांना इंटरनेटवरील फसवणुकीपासून सुरक्षित ठेवते. ती एक कुशाग्र प्रोग्रॅमर, सायबर सुरक्षा तज्ञ आणि समाजसेविका आहे. तेजस्वीला टाईम मासिकाने “किड ऑफ द ईयर 2025” या सन्मानाने गौरवले आहे. वेबसाइट सोप्या भाषेत मार्गदर्शन करते, संशयास्पद संदेश तपासते आणि एफबीआय, एएआरपी यांसारख्या संस्थांपर्यंत तक्रार पोहोचवण्याची सुविधा देते. एआयच्या मदतीने ती 95% अचूकतेने फसवणूक ओळखते.
 
तेजस्वीला वायलिन वाजवण्याची आवड असून ती शाळेच्या ऑर्केस्ट्रातही भाग घेते. तिचे पालक आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे तिने जावा, पायथॉन, एचटीएमएल यांसारख्या भाषा शिकल्या. 2024 मध्ये कांग्रेशनल अॅप चॅलेंजमध्ये तिच्या कामाची दखल घेण्यात आली तसेच टीईडीएक्स टॉकमध्येही तिने सहभाग घेतला. भविष्यात ती आपल्या प्लॅटफॉर्मला जागतिक स्तरावर पोहोचवून अधिकाधिक वृद्ध लोकांना सायबर सुरक्षेची मदत करण्याचे ध्येय ( Kid Of The Year ) ठेवते आहे.
Powered By Sangraha 9.0