नागपूर : (Fake Cop Caught ) पोलिस असल्याचे खोटे बोलून ठकबाजाने एका व्यक्तीला गंडा घातला आहे. पोलीस झडतीच्या बहाण्याने डिक्कीतील २८ हजारांची रोकड त्याच्याकडून लंपास केली आहे. पीडितला पोलिस ठाण्यात पोहोचण्यास सांगून मागच्या मागून फरार झाला आहे. ही घटना शांतीनगर पोलिस ठाण्यांतर्गत घडली असून तक्रार मिळताच पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून काही तासातच त्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या. (Fake Cop Caught ) सुधीर बाबाराव लोखंडे (५४) रा. रेणुका सरस्वती अपार्टमेंट, गांधीनगर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी करण पांडुरंग पखाले (४९) (रा. पंचवटी नगर), बिनाकी लेआऊट हे शनिवारी दुपारी दुचाकी वाहनाने लालगंजच्या झाडे चौकातून जात होते. या दरम्यान दुचाकी वाहन क्र. एमएच-४९/एव्ही-४६२२ वर असलेला आरोपी सुधीर त्यांच्याजवळ आला आणि वाहन थांबविण्यास सांगितले. करण यांनी वाहन थांबविल्याचे कारण विचारले असता सुधीरने पोलीस असल्याची बतावणी केली. त्यानंतर त्याने वाहनाची झडती घेत डिक्कीत ठेवलेली २८ हजारांची रोकड काढून घेतली. वाहनावर मोठ्या प्रमाणात दंड थकित असून तत्काळ लकडगंज पोलिस ठाण्यात पोहोचून दंड भरण्यास सांगितले. (Fake Cop Caught ) स्वत:ही त्यांच्या मागे येत असल्याचे सांगितले आणि रस्त्यातूनच फरार झाला.
काही वेळाने करण यांना आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आली (Fake Cop Caught ). त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. शांतीनगर पोलिस आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले. जबरी चोरी आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज तपासली असता आरोपीच्या वाहनाचा नंबर मिळाला आहे. नंबरवरून पोलिस सुधीरच्या घरी पोहोचले. तो घरीच सापडला. पोलिसांनी त्याच्याकडून रोकड आणि त्याचे दुचाकी वाहनही जप्त (Fake Cop Caught ) केले. सुधीरविरुद्ध यापूर्वीही फसवणूक, अपहरण आणि आर्म्स अॅक्ट अन्वये गुन्हे नोंद झाले आहेत. ही कारवाई पोनि अनिल ताकसांडे, पोउपनि मधुकर काठोके, पोहवा संतोषसिंह ठाकूर, चंद्रशेखर डेकाटे, जितेश रेड्डी, दीपक दासरवार आणि दीपक लाखडे यांनी केली.