Market Oil Tragedy : गरम तेलात पडून तरुणाचा करुण अंत ! नगरधन हादरलं

Top Trending News    15-Sep-2025
Total Views |
 
Market Oil Tragedy
 
रामटेक : ( Market Oil Tragedy ) नगरधन आठवडी बाजारात एक धक्क्कादायक घटना घडली आहे. गरम तेलाच्या कढईत पडून चक्क एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याच संपूर्ण शरीर होरपळल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 13) सायंकाळी 6.४५ वाजताच्या सुमारास तालुक्यातील नगरधन आठवडी बाजारात घडली. प्रशांत कुंवरलाल मसुरके (25, रा. चिचाळा) असे मृतकाचे नाव आहे. प्राथमिक उपचारासाठी त्याला उपविभागीय रुग्णालयात दाखल केले, परंतु जखमा गंभीर असल्याने त्याला नागपूर मेडिकल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. उपचारादरम्यान, रविवारी (दि.१४) सकाळी ५ वाजता त्याचा मृत्यू झाला.
 
घटनेच्या वेळी प्रशांत मद्य प्राशन करून होता. नगरधन येथील नाश्त्याच्या दुकानात गरम भजे घेण्यासाठी प्रवेश करताना त्याचा तोल गेला आणि तो थेट गरम तेलाच्या कढईत पडला. लागलीच जवळच्या दुकानदारांनी त्याला बाहेर काढले. दुकानदार विक्की विजय जनबंधु आणि त्याचे कुटुंब दररोज साप्ताहिक बाजारात नाश्त्याची दुकान चालवतात. यावेळी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने पंचनामा केला आणि प्रकरणी आवश्यक कारवाई ( Market Oil Tragedy ) सुरू केली आहे.