Devendra Fadnavis : फडणवीसांचा मोठा संकल्प ! एक कोटी महिला बनणार लखपती

18 Sep 2025 20:27:39

Devendra Fadnavis
 
फुलंब्री : ( Devendra Fadnavis ) फुलंब्री येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज राज्यस्तरीय अभियानाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुधवारी पार पडले. महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी धनादेश यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. राज्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधत एक कोटी महिलांना ‘लखपती’ बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी महिलांना रोजगार, उद्योजकता व आर्थिक सबलीकरणाच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. प्रास्ताविकामध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की जोपर्यंत या अभियान सुरू आहे, तोपर्यंत मी घरी जाणार नाही.
 
केंद्र व राज्य सरकारच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास ६५ टक्के लोकांचे प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी मंत्री गोरे यांनी केली. या कार्यक्रमासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदिपान भुमरे, खासदार डॉ. कल्याण काळे, माजी खासदार रावसाहेब दानवे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार रमेश बोरणारे, आमदार प्रशांत बंब, आमदार संजना जाधव, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, सभापती डॉ.राधाकिसन पठाडे, पोपटराव पवार, डॉ.अविनाश पोळ ( Devendra Fadnavis ) यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
मोदी सरकारने ( Devendra Fadnavis ) गेल्या काही वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात महिलांना आर्थिक उन्नतीच्या मार्गावर नेणे हा आमचा निर्धार आहे. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंधारणाची कामे हाती घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींना रोल मॉडेल बनवून स्वच्छता, पाणीपुरवठा, डिजिटल सुविधा व आर्थिक सबलीकरणाच्या दिशेने त्या कार्यरत राहतील.
 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
Powered By Sangraha 9.0