Extortion Scam : खंडणीसाठी कार सीज ड्रामा ! अकोल्यात धक्कादायक घटना

Top Trending News    18-Sep-2025
Total Views |

extortion
नागपूर :  ( Extortion Scam ) आरबीआयच्या अधिकाऱ्यांना घेऊन जात असलेल्या ट्रॅव्हल्स कंपनीची कार बँकेच्या खासगी सीजर्संनी अकोल्यात सीज केली. पैसे भरल्यानंतरही त्यांनी गाडी परत देण्यास नकार दिला आणि आणखी पैशांची मागणी केली. शेगावमध्ये आरोपींनी त्यांचे वाहन अडविले. सीजिंग कंपनीचा मालक कुणाल चव्हाणसोबत मिळून अनिकेत आणि अधिकाऱ्यांना कारमधून खाली उतरवले. त्यानंतर जबरीने कार हिसकावून घेत यार्डमध्ये उभी केली. अनिकेतने थकित रक्कम भरली आणि वाहन ( Extortion Scam ) सोडण्याची विनंती केली.
पोलिसांनी या प्रकरणात ४ आरोपींना अकोल्यातून अटक केली आहे. प्रेमकुमार प्रितमदास लड्डानी (५०) रा. अकोला, प्रमोद रमेश नवलकर (४२), राहुल उर्फ रोशन आनंदा वाकोडे (२१) आणि केशव राजू दही (२८) तिन्ही रा. शेगाव अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात पोलिसांनी यस बँकेचा कर्मचारी रोहित खंडेलवाल, वसुली अधिकारी रजनीश द्विवेदी आणि यार्ड मालकालाही आरोपी केले आहे. फिर्यादी अनिकेत सतीश डवले (३५) रा. राजेंद्रनगर, हिंगणा रोड यांचा सतीश ट्रॅव्हल्स नावाने व्यवसाय आहे. त्यांनी यस बँकेकडून फायनांसवर दोन वाहन खरेदी केले होते, ज्यांचे दोन हफ्ते थकीत होते. गत ७ ऑगस्टच्या दुपारी अनिकेत त्यांच्या चारचाकी वाहन क्र. एमएच-३१/एफसी-५८१२ मधून आरबीआयच्या अधिकाऱ्यांना शासकीय कामाने नागपुरातून ( Extortion Scam ) अकोला येथे घेऊन जात होते.
आरोपींनी वाहन सोडण्यासाठी ३५ हजारांची मागणी केली. धमकावून त्यांच्याकडून १५ हजार रुपये घेतले. उर्वरित २० हजार रुपये मिळाल्यावर वाहन सोडून देऊ असे म्हटले. त्यानंतर अनिकेतला जिवे मारण्याची धमकी देत तेथून पळवून लावले. अखेर पीडितने सदर ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी ( Extortion Scam ) विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून वरील चार आरोपींना अकोल्यातून अटक करीत वाहन जप्त केले. इतर आरोपींच्या भूमिकेचा शोध सुरू आहे.