_202509081512331046_H@@IGHT_500_W@@IDTH_950.png)
शिवणगाव पुनर्वसन ( Don Lady ), बेलतरोडी येथील रहिवासी फिर्यादी सुमन जरोंडे (६५) या शनिवारी म्हणजेच ६ सप्टेंबरला साडेचार वाजताच्या सुमारास घरासमोर फेरफटका मारत होत्या, त्याच दरम्यान चेहऱ्यावर रुमाल बांधून एक २८ वर्ष वयोगटातील महिला त्यांच्या जवळ येऊन थांबली. आणि तिने पत्ता विचारण्याचा बहाण्याने त्यांच्याशी बोलू लागली. अचानक जवळील चाकू काढून फिर्यादीच्या गळ्याला लावला. जीवे मारण्याची भीती दाखविली. चाकू पाहताच वृद्ध महिलेच्या बोबडीच वळली.
तोंडाला फडके बांधून आलेल्या २८ वर्षीय महिलेने एका वृद्ध महिलेच्या गळ्यावर चाकू लावला. आरोपी महिलेने मंगळसूत्र मागितले. परंतु, गळ्यातून मंगळसूत्र निघत नसल्याने तिने ते जबरदस्तीने हिसकावले आणि पसार झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. तसेच सीसीटीव्ही फूटेज ( Don Lady ) तपासण्यास सांगितले.
मात्र, बेलतरोडी पोलिसांनी अवघ्या चार तासांत गुन्ह्याचा छडा लावून लूटपाट करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले. चौकशीत घरखर्च भागविण्यासाठी शस्त्र उचलल्याचे तिने पोलिसांना सांगितले. न्यायालयाने तिची कारागृहात रवानगी केली. मात्र, महिलेने फडक्याने चेहरा झाकल्याने तिची ओळख पटत नव्हती.
पोलिसांनी ( Don Lady ) कॅमेरे झूम करून मिळत्या जुळत्या महिलेचा शोध घेतला. चार तासात आरोपी निष्पन्न केले. मात्र, हीच आरोपी असेल, याची खात्री नव्हती. पोलिस पथक 'रिस्क' घेत तिच्या घरपर्यंत गेले. मात्र, आरोपी महिलेनी स्पष्ट नकार दिला. पोलिसांनी शक्कल लढवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तिच्याकडून मंगळसूत्र आणि चाकूही जप्त केला. ही कारवाई वपोनि मुकुंद कवाडे यांच्या मार्गदर्शनात एपीआय रामेश्वर खांडुरे, उपनिरीक्षक किशोर माधवकर, रविकांत भदाने, पोहवा सुहास शिंगणे, सुमेंद्र बोपचे, विवेक श्रीपाद, योगेश कदम, प्रमोद सरपटे, एएसआय राजेंद्र महाजन यांनी केली.
घरखर्चासाठी गुन्हेगारी आरोपी महिला मूळची बालाघाटची तर तिचा पती भंडाऱ्याचा आहे. एका 'मिस कॉल' वरून त्यांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात व्हायला वेळ लागला नाही. दहा वर्षांपूर्वी त्यांचा प्रेम विवाह झाला. त्यांना ९ वर्षांची एक मुलगी आहे. ते नागपुरात राहायला आले. पती खाजगी कारवर चालक आहे. त्याला १२ ते १५ हजार रुपये मिळतात. सात हजार रुपये घरभाडे द्यावे लागते. उर्वरित पैशात घरखर्च, औषधोपचार, मुलाचे शिक्षण शक्य नाही. आर्थिक अडचण वाढतच होती. मार्ग निघत नसल्याने तिने शस्त्र उचलले. परंतु पहिल्याच प्रयत्नात ती ( Don Lady ) पोलिसांच्या जाळ्यात अडकली.