Khopade Vs Vanjari : आतूनच बंडखोरी ? खोपडेंचा इशारा, रोहित खोपडेंनी उघडले वंजारींचे कान !

02 Jan 2026 20:26:05

Khopade Vs Vanjari
 
नागपूर : ( Khopade Vs Vanjari ) भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांच्यातील शाब्दिक युद्ध चांगलेच पेटले असून, रोहित खोपडेंनी काँग्रेसमध्ये यावे, अशी वंजारींनी ऑफर दिली होती. त्यावर आमदार कृष्णा खोपडे यांनी पलटवार करत 'वंजारींनी आधी आपल्या कार्यकर्त्यांची काळजी घ्यावी आणि नंतर दुसऱ्यांच्या घरात डोकावावे' अशा बोचऱ्या शब्दांत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
 
आमदार कृष्णा खोपडे ( Khopade Vs Vanjari ) यांनी काँग्रेसच्या संस्कृतीवर हल्लाबोल करताना म्हटले की, भाजप हा कार्यकर्त्यांचा आणि कामाचा सन्मान करणारा पक्ष आहे, तर काँग्रेस हा पूर्णपणे घराणेशाहीच्या दलदलीत रुतलेला पक्ष आहे. वंजारी यांनी रोहित खोपडेंबद्दल केलेले विधान अत्यंत हास्यास्पद आणि बेजबाबदार आहे. काँग्रेसमध्ये बूथ पातळीवर काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर सतत अन्याय केला जातो, पैसा आणि प्रभावाच्या जोरावरच तिथे पदे वाटली जातात, असा घणाघाती ( Khopade Vs Vanjari ) आरोपही त्यांनी केला.
 
कौटुंबिक फूट पाडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न
 
रोहित खोपडे ( Khopade Vs Vanjari ) यांनी भाजपचा राजीनामा दिल्याच्या वावड्या उठवणाऱ्या वंजारींना खोपडेंनी चोख प्रत्युत्तर दिले. रोहित हा भारतीय जनता युवा मोर्चाचा एक निष्ठावंत पदाधिकारी आहे. त्याने उमेदवारी मागणे हा त्याचा हक्क होता, परंतु पक्षाने निर्णय घेतल्यावर त्याने स्वतः प्रस्तावक म्हणून स्वाक्षरी करून पक्षशिस्त पाळली आहे, असे असतानाही वंजारींनी कुटुंबात फूट पाडण्याचे खालच्या पातळीचे राजकारण केले आहे, अशी टीका खोपडेंनी केली. वंजारींना मानसिक उपचारांची गरज! स्वतः रोहित खोपडे यांनीही या वादात उडी घेत वंजारींना थेट आव्हान दिले. मी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे. वंजारी यांनी माझ्याबद्दल बेजबाबदार भाष्य करण्यापेक्षा त्यांच्या मानसिक आजारावर उपचार करून घ्यावेत, अशा कडक शब्दांत रोहित खोपडेंनी वंजारींचा ( Khopade Vs Vanjari ) समाचार घेतला.
 
निष्ठावंतांचा बळी देणारी काँग्रेस
 
महापालिका निवडणुकीतही काँग्रेसने प्रामाणिक कार्यकर्त्यांना बाजूला सारून केवळ धनदांडग्यांना संधी दिली आहे. स्वतःच्या पक्षातील असंतोष वंजारींना दिसत नाही का ? असा सवाल खोपडे यांनी उपस्थित केला. दुसऱ्यांच्या पक्षात ढवळाढवळ करण्यापेक्षा वंजारींनी ( Khopade Vs Vanjari ) त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी घ्यावी आणि त्यांच्या प्रगतीसाठी काम करावे, असा खोचक सल्लाही यावेळी देण्यात आला.
 
 
Powered By Sangraha 9.0