अंजनगाव सुर्जी : ( Khichdi Poisoning ) राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचा मुख्य उद्देश वंचित घटकांतील विद्यार्थ्यांचे कुपोषण रोखणे, शाळांतील नोंदणी व उपस्थिती वाढवणे हा आहे. मात्र, याच योजनेतील अन्न मुलांच्या जीवाला धोका ठरत असल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. येथील सीताबाई संगई शाळेत मध्यान्ह भोजनात देण्यात आलेली खिचडी खाल्ल्याने तब्बल १२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी (दि. २४) उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका पालकाने मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी ( Khichdi Poisoning ) यांच्याकडे तक्रार दाखल करत संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करून करार रद्द करण्याची मागणी केली आहे.
मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत ( Khichdi Poisoning ) अन्नाच्या गुणवत्तेवर देखरेख करण्याची जबाबदारी पंचायत समितीतील पोषण अधीक्षकांकडे असते. तथापि, या प्रकरणात पोषण अधीक्षकांनी परिस्थितीकडे दुर्लक्ष करत कंत्राटदाराला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जात आहे. मुख्याध्यापकांनी स्पष्ट केले की, खिचडी पुरवठा करणारा कंत्राटदार व शालेय पोषण अधीक्षक हे या प्रकरणास जबाबदार आहेत. शहरातील काही शाळांना खिचडी शिजवण्याचे व पुरवण्याचे कंत्राट ‘नुरैल’ नावाच्या बचतगटाला देण्यात आले असून त्यांचे स्वयंपाकघर सुर्जी परिसरात आहे.
स्वयंपाकघर अन्न व औषध प्रशासनाचा परवाना व सूचना फलक नसतानाही चालवले जात असल्याचा आरोप ( Khichdi Poisoning ) आहे. घटनेनंतर दोष लपवण्यासाठी स्वयंपाकघर तत्काळ स्वच्छ करण्यात आल्याची माहिती समोर येत असून, यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. तरीही पोषण अधीक्षक शीला आठवले कंत्राटदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप पालक व नागरिकांकडून होत आहे.
या प्रकरणाची तक्रार प्राप्त झाली असून दोन दिवसांत मुख्याध्यापकांकडून स्पष्टीकरण मागवले ( Khichdi Poisoning ) आहे. त्यानंतर कारवाई केली जाईल.
-सुधीर खोडे, गटशिक्षणाधिकारी, अंजनगाव सुर्जी
खिचडी पुरवठा करणारा कंत्राटदार व पोषण अधीक्षक यांच्या देखरेखीखाली ही योजना चालते. या घटनेला दोघेही जबाबदार आहेत.
-राकेश डोणगावकर, मुख्याध्यापक, सीताबाई संगई शाळा.
मला अद्याप या प्रकरणाची तक्रार मिळालेली नाही. जर मुलांना काही झाले असते तर आधी मुख्याध्यापक आणि नंतर मी तुरुंगात गेलो असतो.
-शीला आठवले, पोषण अधीक्षक, अंजनगाव सुर्जी.