CM Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीला महापालिकेत मानाचे स्थान ? प्रथमच निवडून आल्यानंतरही......

Top Trending News    31-Jan-2026
Total Views |

cm fad 
नागपूर : ( CM Fadnavis ) भाजपकडून महापौर व उपमहापौर पदाच्या उमेदवारांचा अर्ज सोमवारी दुपारी २ वाजता दाखल करण्यात येणार आहे. पक्षाने अद्यापही उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवली असली तरी पक्षांतर्गत चर्चांचे गुऱ्हाळ सुरू आहे. मनपात एकहाती असे १०२ सदस्यांच्या बहुमतानंतरही भाजपकडून अत्यंत गुप्तता पाळली जात आहे. महापौर पद सर्वसाधारण महिला आरक्षीत आहे. परंतु, धक्कातंत्र देण्याच्या पक्षाच्या धोरणानुसार महापौर पदासाठीही याचा अवलंब केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Fadnavis ) यांनी महापौर, उपमहापौर व स्थायी समितीची नावे ठरविली आहेत. मात्र, ती उघड करण्यास मनाई असल्याने पक्षातील अनेकजण तोंडावर बोट ठेवून आहे.
 
त्यानंतर दक्षिण नागपूरला अद्यापही महापौर पद मिळाले नसल्याचा दाखला देत ज्येष्ठ नगरसेविका नीता ठाकरे यांच्या नावाचीच चर्चा आहे. सोबत दिव्या धुरडे, विशाखा मोहोड अशी नावेही आहेत. ( CM Fadnavis ) शिवानी दाणी या आथिंक विषयाचा तज्ज्ञ असल्याने त्यांच्यावर स्थायी समितीची जबाबदारी सोपविण्यात येईल, अशीही जोरदार चर्चा आहे. त्यांना अनुभव आल्यावर महापौर पदाचा विचार करता येईल, असाही एक मतप्रवाह आहे.
 
बजटमधील बारकावे दाणी सहज समजू शकतात. त्यामुळे त्यांच्या नजरेखालून मनपाचे बजेट जावे, असा एक सूर आहे. दोन महिलांना महत्वाची पदे दिल्यास पुरूष उमेदवारास उपमहापौर पद दिले जाईल. अशावेळी आतापर्यंत मध्य नागपूरला मोठे पद न मिळाल्याने उपमहापौर पद दिले जाण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास अनुभवी अॅड. संजय बालपांडे यांचे नाव अग्रक्रमावर असेल. त्यांना स्थायी समिती हवी होती. परंतु, पक्षाने आदेश दिल्यास त्यांना मान्य करावे लागेल. शिवाय, पर्याय म्हणून उत्तर नागपुरलाही उपमहापौर पद दिले जाऊ शकते. असे झाल्यास जातीय समीकरणाच्या आधारावर ( CM Fadnavis ) अनुभवी नगरसेवक महेंद्र धनविजय यांचेही नाव पुढे येण्याची दाट शक्यता आहे.
 
परिवहन पुन्हा बंटी कुकडेंकडे ?
 
बाल्या बोरकर यांची गटनेतेपदी निवड झाल्याने परिवहन समितीवर बंटी कुकडे यांचा दावा पक्का झाल्याची चर्चा आहे. कुकडे यांनी दोनदा या समितीचे सभापतीपद भूषविले आहे. पदावर असताना त्यांनी काही नवकल्पना आपली बस सेवेत सुरू केल्या होत्या. अनुभवाच्या आधारावर पक्ष त्यांना पुन्हा हे पद देणार की, नवा चेहरा पुढे आणणार, याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या ( CM Fadnavis ) आहेत.
 
शिक्षण, आरोग्य समितीवर अनुभवी
 
मनपातील ( CM Fadnavis ) दहा समितींपैकी शिक्षण व आरोग्य समितीही अत्यंत महत्वाची मानली जाते. पक्षात अनेक अनुभवी नगरसेवक निवडून आले. यात दिलीप दिवे, शेषराव गोतमारे, पिंटु झलके, दीपक वाडीभस्मे, प्रदीप पोहाणे, माया इवनाते, साधना बरडे, लक्ष्मी यादव, दिव्या धुरडे, सारीका नांदुरकर, रूपाली ठाकूर, भारती बुंदे, संदीप गवई, लीला हाथीबेड, विद्या कन्हेरे, सुनील हिरणवार यांचा समावेश आहे. तर, संजय अवचट, कल्पक भनारकर, मनिषा अतकर, अभिरूची राजगीरे, विनोद कन्हेरे, विनय दाणी, श्रीकांत आगलावे, अजय बोढारे आदींचाही समावेश आहे.
 
बहुचर्चीत नाव
 
पक्षाने यंदा महापौरपद दक्षिण नागपूरला देण्याचा निर्णय ( CM Fadnavis ) घेतल्याची चर्चा आहे. यासाठी अनुभवी नगरसेविका निता ठाकरे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तर, स्थायी समितीवर बहुचचींत नाव शिवाणी दाणी यांची वणीं लागेल, असेही बोलले जात आहे. उपमहापौर पद मध्य नागपूरला मिळेल. अशात ज्येष्ठ नगरसेवक अॅड. संजय बालपांडे यांचे नाव सर्वात समोर असेल. शिवाय, उत्तर नागपूरचाही या पदासाठी विचार केला जाऊ शकतो. मात्र, या केवळ चर्चाच आहेत. अनपेक्षीतपणे या तिन्ही पदांवर वेगळीही नावे येऊ शकतात, अशीही दबक्या आवाजात चर्चा आहे. कारण जी नावे सर्वाधिक चर्चेत असतात, त्यावर भाजपकडून शिक्कामोर्तब होत नाही, तर ऐन वेळी वेगळीच नावे समोर येतात, असाही एक अनुभव आहे.